आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांपूर्वी एवढा लठ्ठ झाला होता की लोक मारायचे टोमणे, आता नवीन रुपात दिसला फरदीन खान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता फरदीन खान गुरुवारी रात्री मुंबई एअरपोर्टवर दिसला. 44 वर्षीय फरदीनसोबत त्याची पत्नी नताशा माधवानी आणि दोन्ही मुले डॅनी इसाबेला खान आणि अजारियस फरदीन खान होते. मात्र लोकांचे लक्ष यावेळी त्याच्या कुटुंबावर नव्हे तर त्याच्या हेल्थवर गेले. तो पुर्वीपेक्षा बराच सडपातळ दिसला. त्याच्या या नवीन लूकचे फोटो मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. दोन वर्षांपूर्वी फरदीनचा एक फोटो व्हायरल झाला होता, त्यात तो खूप लठ्ठ दिसला होता. शिवाय तो वयापेक्षा मोठा दिसत होता. वाढलेल्या वजनामुळे लोकांनी त्याला बरेच टोमणेसुद्धा मारले होते.

 

8 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे फरदीन... 

- फरदीन खान गतकाळातील सुपरस्टार दिवंगत फिरोज खान यांचा मुलगा आहे. 1998 मध्ये त्याने 'प्रेम अगन' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अखेरचा तो 2010 मध्ये आलेल्या 'दूल्हा मिल गया' या चित्रपटात झळकला होता. त्यानंतर तो चित्रपटसृष्टीपासून दूर गेला. फरदीनची पत्नी नताशा गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांची मुलगी आहे. 

बातम्या आणखी आहेत...