आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षे लहान गर्लफ्रेंडसोबत फरहान अख्तरने या ठिकाणी घालवले खास क्षण, स्वतः शिबानीने शेअर केले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. बॉलिवूड अॅक्टर फरहान अख्तरने नुकताच 9 जानेवारीला आपला 45 वा वाढदिवस साजरा केला. या दरम्यान त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर (38)सोबत होती. फरहान आणि शिबानने बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटोजही सोशल मीडियावर शेअर केले होते. पण आता शिवानीने काही नवीन फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये शिबानी रेड अँड व्हाइट ड्रेसमध्ये दिसतेय.

तिच्यासोबत फरहान कॅज्यूअल ड्रेसमध्ये दिसतोय. फोटोला शिबानीने कॅप्शन दिले की, No biggie Just another casual movie night celebrating @faroutakhtar‘s bday. यापुर्वी फरहानने एक फोटो शेअर करत लिहिले होते - 'जोपर्यंत तु माझ्यासोबत आहे, मी एका चमकत्या ता-याला कधीच हरवू देणार नाही. शिबानी, तुझ्यासाठी खुप प्रेम.'


लग्नाच्या 17 वर्षांनंतर फरहानने पत्नीला दिला घटस्फोट 
फरहान अख्तर आणि त्याची पहिली बायको अधुनाने एप्रिल 2017 मध्ये घटस्फोट घेतला. 17 वर्षांनंतर ते वेगळे झाले. यांचे लग्न 2000 मध्ये झाले होते. फरहानच्या आयुष्यात श्रध्दा कपूर आल्यानंतर त्याचा पत्नीसोबत वाद झाला होता. हळुहळू वाद वाढत गेला आणि फायनली दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अधुना आणि फरहानला दोन मुली आहेत, यांची नाव शाक्या (15वर्षे) आणि अकीरा (7 वर्षे) असे आहे. घटस्फोटानंतर दोन्ही मुली आईसोबत राहतात. 

 

शक्ती कपूरच्या मुलगीसोबत लिव्ह-इनमध्ये राहिल्याचे वृत्त 
जानेवारी 2017 मध्ये फरहान आणि श्रध्दा कपूर लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचे वृत्त आले होते. त्यावेळी श्रध्दाचे वय अवघे 30 वर्षे होते तर फरहान 43 वर्षांचा होता. श्रध्दाचे वडील शक्ती कपूर स्वतः फरहान अख्तरच्या घरी पोहोचले आणि श्रध्दाला तिथून जबरदस्तीने आपल्या घरी घेऊन गेले असे बोलले जाते. पण यानंतर शक्ती कपूर आणि श्रध्दा कपूर यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. रिपोर्टनुसार, 'रॉक ऑन 2' मध्ये काम करताना श्रध्दा आणि फरहान यांची जवळीक वाढली होती. यानंतर फरहान जुहू येथील घर सोडून श्रध्दासोबत लव्ह-इनमध्ये राहत होता. 

 

गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात फरहान-शिबानी 
शिबानी आणि फरहान गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांची भेट 2015 मध्ये आलेल्या 'आय कॅन डू इट' दरम्यान झाली होती. फरहान हा शो होस्ट करत होता आणि शिबानी या शोचा एक भाग बनली होती. शिबानीने सलमानच्या 'सुल्तान' चित्रपटात काम केले आहे. यासोबतच मॉडल आणि प्रसिध्द एमटीव्ही वीजे अॅक्ट्रेस-सिंगर अनुषा दांडेकर तिची बहीण आहे. तिने 2014 मध्ये आलेल्या मराठी चित्रपट 'टाइमपास'मध्ये आयटम नंबरने सुरुवात केली होती. यानंतर 2015 मध्ये ती  'रॉय', 'नाम शबाना', 'नूर', 'भावेश जोशी' आणि 'शानदार' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. 

 

बातम्या आणखी आहेत...