आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत पूलमध्ये रोमांटिक मूडमध्ये दिसला 45 वर्षीय अभिनेता, 17 वर्षांनंतर पत्नीला घटस्फोट देऊन आता 'सुल्तान' च्या अभिनेत्रीला करत आहे डेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर 45 वर्षांचा झाला आहे. 9 जानेवारीला बर्थडेच्या निमित्ताने फरहानची गर्लफ्रेंड आणि सिंगर शिबानी दांडेकरने एक फोटो शेयर केला. या फोटोमध्ये शिबानी स्वतः 7 वर्षांनी मोठ्या असलेल्या बॉयफ्रेंडसोबत रोमांटिक मूडमध्ये दिसत आहेत. मात्र आता दोघांचाही आणखी एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये फरहान पूलमध्ये शिबानीसोबत एन्जॉय करतांना दिसत आहे. या फोटोमध्ये शिबानीला फरहानने उचलून घेतल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हा फोटो येताच लोकांनी त्यांना ट्रोल करणे सुरु केले आहे. एका यूजरने लिहिले, 'Uncle with a hot young girl'. 

 

मागच्या 3 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात फरहान-शिबानी...
शिबानी आणि फरहान मागच्या 3 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांची भेट 2015 मध्ये शो 'आय कॅन डू दॅट' मध्ये झाली होती. फरहान त्या शोला होस्ट करत होता आणि शिबानीही त्या शोचा भाग होती. शिबानीने सलमानच्या फिल्म 'सुल्तान' मध्ये काम केले आहे. यासोबतच ती शिबानी मॉडल आणि प्रसिद्ध एमटीवी व्हीजे अभिनेत्री-सिंगर अनुषा दांडेकरची बहीण आहे. तिने 2014 मध्ये आलेला मराठी चित्रपट 'टाइमपास' मध्ये आइटम नंबरने सुरुवात केली होती. यानंतर 2015 मध्ये 'रॉय', 'नाम शबाना', 'नूर', 'भावेश जोशी' आणि 'शानदार' अशा चित्रपटातही दिसली आहे.

 

लग्नाच्या 17 वर्षांनंतर फरहानने दिला पत्नीला घटस्फोट...
फरहान अख्तर आणि त्याची एक्स वाइफ अधुनाने एप्रिल, 2017 मध्ये घटस्फोट घेतला. दोघे 17 वर्षानंतर वेगळे झाले. यांचे लग्न 2000 मध्ये झाले होते. म्हणले जाते की, फरहानच्या लाइफमध्ये श्रद्धा कपूर आल्यांनतर रोज त्याचे त्याच्या पत्नीसोबत वाद व्हायचे. हळू हळू वाद वाढत गेले आणि फायनली दोघांनी घटस्फोट घेतला. अधुना आणि फरहानला दोन मुली आहेत. ज्यांचे नाव शाक्या (15 वर्ष) आणि अकीरा (7 वर्ष) आहे. घटस्फोटानंतर दोन्ही मुली आईसोबतच राहतात.

 

श्रद्धा कपूरसोबत लिव्ह-इनमध्ये राहिल्याची होती चर्चा... 
- जानेवारी, 2017 मध्ये फरहान आणि श्रद्धा कपूरच्या लिव्ह-इनमध्ये राहण्याची चर्चा होती. त्यावेळी श्रद्धाचे वय 30 वर्षे तर फरहानचे वय 43 वर्ष होते. सांगितले जाते की, श्रद्धाचे पिता शक्ति कपूर स्वतः फरहान अख्तरच्या घरी पोहोचले आणि श्रद्धाला तिथून जबरदस्ती आपल्या घरी घेऊन आले. मात्र नंतर शक्ति कपूर आणि श्रद्धा कपूर दोघांनीही हे सर्व खोटे असल्याचे सांगितले. रिपोर्ट्सनुसार, फिल्म 'रॉक ऑन 2' मध्ये काम करताना फरहान आणि श्रद्धाची जवळीक वाढली होती. यांनतर फरहान जुहूचे घर सोडून श्रद्धासोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. 

बातम्या आणखी आहेत...