• Home
  • News
  • Farhan's had hair line fracture during 'Tufaan' shooting, X ray report shared on social media

अपघात / 'तूफान' च्या शूटिंगदरम्यान फरहानच्या हाताला झाले हेअर लाइन फ्रॅक्चर, सोशल मीडियावर शेअर केला एक्स-रे

ड्र्यू नीलने दिले किक बॉक्सिंगचे ट्रेनिंग

दिव्य मराठी वेब टीम

Oct 13,2019 04:03:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : असे म्हणतात की, कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. असेच काहीसे फरहान अख्तरसोबत झाले. 'तूफान' च्या शूटिंगदरम्यान फरहानच्या हाताला हेअर लाइन फ्रॅक्चर झाले. फरहानने आपल्या हाताचा एक्स-रे रिपोर्ट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.


कार्पल बोनवर आहे फ्रॅक्चर...
फरहानने लिहिले, 'जेव्हा नेचर टेट्रिस खेळते तेव्हा असे होते. ही बॉक्सिंगमधील माझी पहिली जखम आहे. हे तळहातावर झालेले हेअर लाइन फ्रॅक्चर आहे. जे हाताच्या कार्पल बोनवर आहे.


या चित्रपटांशी होऊ शकते टक्कर...
पुढच्यावर्षी रिलीज होणार असलेला चित्रपट 'तूफान' ची टक्कर अनेक मोठ्या चित्रपटांशी होऊ शकते. ज्यामध्ये जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते-2', विक्की कौशलचा 'ऊधम सिंह', कंगना रनोटचा 'धाकड' आणि शाहरुख खानचा 'ऑपरेशन खुखरी' हे चित्रपट सामील आहेत.


'तूफान' चे डायरेक्शन राकेश ओमप्रकाश मेहराने केले आहे, ज्यांनी यापूर्वी फरहानसोबतच 'भाग मिल्खा भाग' बनवला होता. प्रोड्यूसर रितेश सिधवानी, राकेश आणि फरहान स्वतः आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2020 ला रिलीज होईल.


ड्र्यू नीलने दिले किक बॉक्सिंगचे ट्रेनिंग...
फरहानला 'तूफान' साठी किक बॉक्सिंगचे ट्रेनिंग या खेळाचे माझी विश्व चॅम्पियन ड्रयू नीलने दिले आहे. नीलनेदेखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फरहानच्या ट्रेनिंग सेशनचे अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

X
COMMENT