आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याने बांधले पीएम मोदींचे मंदिर, मंदिरात ठेवली 2 फूटाची मूर्ती; दिवसातून चार वेळेस होते आरती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिरात तामिळनाडूचे सीएम पलानीस्वामी, जयललिता आणि रामचंद्रन यांचे देखील फोटो
  • शेतकरी म्हणतो - मोदी देवासारखे, कारण ते विकास करायला आले आहेत

चेन्नई - तमिळनाडूच्या त्रिचीमध्ये 50 वर्षीय शेतकरी पी. शंकरे आपल्या शेतात पंतप्रधान मोदींचे मंदिर उभारले आहे. या मंदिराला नमो असे नाव देण्यात आले. येथे दिवसातून चारवेळेस आरती केली जाते. पंतप्रधान मोदींनी स्वतः या मंदिराचे उद्घाटन करावे अशी शंकर यांची इच्छा आहे. या मंदिरात मोदींच्या मूर्तीसह एम.जी रामचंद्रन, जे.जयललिता आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. शंकर म्हणतात की, "मोदी देवासारखे आहेत, कारण ते विकास करण्यासाठी आले आहेत." मोदींच्या मूर्तीसाठी आला 10 हजार रुपये खर्च 


पी.शंकर त्यांचे गाव इराकुडी येथे किसान संघाचे अध्यक्षही आहेत. त्यांनी सांगितले की, ते 2014 पासून मंदिर उभारण्याबाबत विचार करत होते. अगोदर त्यांनी मोदींची धातूची मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यासाठी एक लाख रूपये खर्च येत होता. तर ग्रेनाइटच्या मूर्ती 80 हजारांत भेटत होती. मात्र त्यांचे एवढे बजट नसल्यामुळे त्यांनी दगड आणि सिमेंटने दोन फूटाची मूर्ती तयार केली. मूर्तीसाठी 10 हजार रूपये खर्च आला तर इतर पैसे मंदिराच्या कामासाठी लागले. शंकर यांनी मंदिर उभारण्यासाठी कोणतीही मदत घेतली नाही. 

शंकर म्हणाले - मोदी मंदिर हे त्यांच्यावरील प्रेम


पी. शंकरच्या मते, "हे मंदिर मोदींवरील प्रेमाचे उदाहरण आहे. याच्या निर्मितीच्या मागे अनेक कारणे आहेत. वैद्यकीय प्रवेशासाठी घेतलेली नीट परीक्षा हे एक कारण आहे. त्यांच्या मुलीला प्लस2 मध्ये 1105 गुण मिळाले होते. वैद्यकीय परीक्षेत ती 2 गुणांनी नापास झाली होती. खाजगी मेडीकल कॉलेज प्रवेशासाठी पैशाची मोठ्या प्रमाणावर मागणी करत होते. पैसे नसल्यामुळे मुलीने अण्णा विद्यापीठात अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला. आता नीट सुरू झाल्याने मेडिकल प्रवेशाचा अवैध धंदा थांबला आहे."