आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारीपणामुळे जामनेर तालुक्याती शेतकऱ्याची विष प्राषण करून आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जामनेर तालुक्यातील रोटवद येथील कर्जबाजारी शेतकरी किसन विठ्ठल माळूकर यांनी शुक्रवारी विष प्राषण करून आत्महत्या केली. जामनेर उपजिल्हा रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदनाच्या वेळेबाबत विचारल्यावर अरेरावी केल्याचा अाराेप मृताच्या नातेवाईकांनी केला. यामुळे तासभर गोंधळ चालला. 


रोटवद येथील किसन विठ्ठल माळूकर (वय ६५) या कर्जबाजारी शेतकऱ्याने घरी काेणीही नसल्याचे पाहून विषप्राशन केले. माळूकर यांनी विष प्राशण केल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने जामनेर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच माळूकर हे मृत झाल्याचे डॉ.जयश्री पाटील यांनी एक वाजेदरम्यान घोषित केले. 

बातम्या आणखी आहेत...