आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांच्या भरवश्यावर बँक-सावकारांकडून कर्ज घेत दोन मुलींचे लग्न लावले, हाती काहीच लागले नाही; कर्जबाजारी शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - नागरसोगा (ता. औसा )  येथील जनक विठ्ठल काळे ( ४०)  या शेतकऱ्याने  स्वत‌:च्या शेतात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. शनिवारी रात्री या शेतकऱ्याने विष घेतले होते. त्यांना तात्काळ औसा आणि नंतर लातूरला हलवण्यात आले. लातूर येथे उपचार सुरू असताना रविवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला.


कुटुंबीयांंकडून मिळालेल्या माहितीनुसार जनक काळे यांंच्यावर एका राष्ट्रीयीकृत बँकेचे तसेच खाजगी कर्ज  होते. गेल्या तीन वर्षांत दोन मुलींचे लग्न झाले. या लग्नासाठी त्यांनी बँक कर्ज तसेच खासगी कर्ज काढले होते. परंतु गेल्या काही वर्षांत शेतीमध्ये उत्पादनच निघाले नाही. यावर्षी पुन्हा दुष्काळाचे ढग दिसू लागल्यामुळे  कर्ज कसे फेडायचे या विचारांनी त्यांना नैराश्य आले होते.  त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर  सोमवारी सकाळी नागरसोगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.