आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाम्हणे येथील शेतकऱ्याची गळफासाने आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


 धुळे-शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या शेतकऱ्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. 


बाम्हणे गावातील पंढरीनाथ रामदास रगडे-पाटील (वय ५३) यांनी शेतात झाडाला गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर काही वेळात पाेलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचे पथक दाखल झाले. हा प्रकार काल गुरुवारी घडला. पंढरीनाथ रगडे-पाटील यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंढरीनाथ रगडे बाम्हणे गावातील मूळ रहिवासी असून, काही वर्षांपासून त्यांचे कुटुंबीय व ते धुळे तालुक्यातील अवधान येथे वास्तव्यात गेले होते. सुमारे आठवड्यापासून पंढरीनाथ रगडे बाम्हणेला आले होते, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. या प्रकरणी देवेंद्र सुकदेव रगडे-पाटील यांच्या माहितीवरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज मृत पंढरीनाथ रगडे-पाटील यांच्या नातलगांनी व्यक्त केला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...