आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिंडोरी तालुक्यात आवकाळी पावसाने घेतला बळी, नुकसानीला कंटाळून शेतकऱ्याची औषध प्राशन करुन जीवन संपवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडोरी- तालुक्यातील मोहाडी येथील संजय भास्कर देशमुख या शेतकऱ्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून न्युऑन नावाचे औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. 
ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात जोर धरला असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागा उद्धवस्त झाल्या, विशेषतः द्राक्षबागांवर मोठे संकट कोसळले असून गारपीट व अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका द्राक्ष बागांना बसला आहे. 
कर्जबाजारी होऊन द्राक्षबागा जगवण्याचे काम शेतकरी करत असताना अचानक निसर्गाने ऐन दिवाळीत शेतकर्‍यांचे दिवाळ काढण्याचे काम सुरू केले असून या अवकाळी च्या फटक्यामुळे आणि होणाऱ्या नुकसानीमुळे दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील संजय भास्कर देशमुख (वय 48) या शेतकऱ्याने न्युऑन नावाचे औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. या शेतकऱ्यावर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज असून इतरही काही बँकांचे कर्ज आहे का याविषयी चौकशी सुरू आहे. भास्कर देशमुख यांच्याकडे दीड एकर द्राक्ष बाग होती. अवकाळीचा फटका द्राक्ष बागांना बसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीत कळते. 


काल (गुरूवार दि. 31 नोव्हेंबर) रात्री जेवण झाल्यावर बाहेरच्या पडवीत संजय देशमुख हे झोपी गेले. त्यांचे मुलेही घरात झोपले होते. सकाळी मुलगा नितीन हा उठल्यानंतर बाहेर येताच वडिलांच्या तोंडाला फेस आलेले बघितला आणि त्यांच्या शेजारी न्युऑन नावाच्या औषधाची बाटली पडली होती. त्यानंतर मुलाने संजय देशमुख यांना उठवण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही प्रतिसाद न आल्यामुळे आरडाओरडा करून त्यांनी शेजारील चुलते वगैरे त्यांना बोलून घेतले. त्यानंतर आत्महत्येची माहिती दिंडोरी पोलिस स्टेशनला कळवली असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबाच्या हवाली केला. दरम्यान, या घटनेने परिसरात शोकाकुल वातावरण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...