आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नापिकी व कर्जास कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास, पालम तालुक्यातील घटना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 25 हजारांच्या कर्जाची परतफेड करता आली नसल्याने उचचले टोकाचे पाऊल

परभणी- जिल्ह्यातील सातेगाव(ता.पालम) येथील एका ज्येष्ठ शेतकऱ्याने शेतातील नापिकी व बँकेच्या कर्जास कंटाळून रविवारी(दि.24) सकाळी साडेसातच्या सुमारास स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेवून आत्महत्या केली. शेख हुसेन शेख बाबर(वय60) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सातेगाव येथील शेख हुसेन यांना स्वतःच्या मालकीची दीड एकर शेती आहे. परंतू या शेतीत गेल्या दोन वर्षात उत्पन्नच झाले नाही. त्यांनी पालमच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 2016 मध्ये 25 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. या कर्जाची ही परतफेड करणे त्यांना अशक्य होते. त्यातूनच ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विपन्नस्थेत होते. त्यातूनच त्यांनी रविवारी सकाळी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचा मुलगा शेख अब्दुल शेख हुसेन यांनी पालम पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...