आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात विष घेऊन शेतकरी दाम्पत्याने केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गांधीग्राम येथे शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. शेख उमर शेख मन्नान (४७) आणि नजरुन बी शेख उमर (४३) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. गांधीग्राम येथील शेख उमर याच्याकडे अडीच एकर शेती आहे. एका मुलीचे लग्न झाले असून, तीनमुलांचा उदरनिर्वाह याच शेतीवर चालत होता. मात्र सततच्या नापिकीमुळे शेख उमर कर्जबाजारी झाले. त्यांच्यावर खासगी सावकारांचे व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज आहे. शनिवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान शेख उमर व त्यांची पत्नी नजरुन बी दोघेही शेतात भाकरी बांधून शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते. त्या ठिकाणी दोघांनीही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

 

घटनेची वार्ता शेजारी शेतातील मजुरांना कळल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवले होते. घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी रुग्णालयात धाव घेत मृतक शेख उमर यांचे भाऊ तसेच नातेवाईकांचे सांत्वन केले. दुपारी चार वाजताच्या सुमारास मृतदेह गांधीग्राम येथे रवाना झाले.सायंकाळी त्यांच्यावर दफनविधी संस्कार करण्यात आले. 


 


शेतकरी आत्महत्यांची विदारक आकडेवारी 

१५५ शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या. 
२०१६ 
१६७ शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या. 
२०१७ 
२०१८ 
१ जाने. ते ३० नोव्हें 


शेख उमर कर्जामुळे त्रस्त होता 
शेख उमरच्या मुलीचे आठ महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. त्यासाठी त्याने काही जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. तसेच बँकेचेही कर्ज त्याच्यावर होते. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून तणावात दिसत होता. पण तो आत्महत्या करेल असे कधी वाटले नव्हते. दोघांच्या मृत्यूमुळे आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. - शेख जमील शेख मन्नान, मृतकाचा मोठा भाऊ. 


११० शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या. 
७९ शासनदरबारी पात्र 
९६ शासनदरबारी पात्र 
६६ शासनदरबारी पात्र 
७६ अपात्र ठरल्या. 
७१ अपात्र ठरल्या. 
३१ अपात्र ठरल्या. 
१३ प्रस्ताव प्रलंबित 
११ महिन्यांत ११० शेतकरी आत्महत्या 


शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढताच आहे. एकीकडे शेती धोरणात आमुलाग्र बदल घडवून आणल्याचा गवगवा होत असला तरी दर तिसऱ्या दिवशी एक शेतकरी कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. १ जानेवारी ते १ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्यापैकी ६६ प्रकरणे शेतकरी आत्महत्येस पात्र ठरली आहेत. 


सहा वर्षाच्या चिमुकलीसह तीन भावंड पोरकी 
शेख उमर शेख मन्नान आणि नजरुन बी शेख उमर यांच्या संसारवेलीवर चार मुले आहेत. एक मुलगी सहा वर्षाचीच आहे. तर दुसरा मुलगा १० वर्षाचा व तिसरा मुलगा १८ वर्षाचा आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचा आठ महिन्यापूर्वीच निकाह झाला आहे. आता या चारही भावंडाच्या डोक्यावरील मातापित्यांचे छत्र हरवल्याने ती पोरकी झाली आहेत. मुलांकडे पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...