आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत शेतकरी दांपत्याची आत्महत्या; नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवले जिवन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब- तालुक्यातील आढाळा येथील वृद्ध शेतकरी दांपत्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी (दि. ४) पहाटेच्या दरम्यान घडला. अशा प्रकारे शेतकरी दांपत्याने आत्महत्या करण्याची तालुक्यातील ही पहिलीच वेळ आहे. 


आढाळा गावात शिवाजी अंबादास वायसे (५५) कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नी धोंडूबाई वायसे (५०), मुलगा बालाजी वायसे यांच्या नावे शेतजमीन आहे. सातत्याने होणारी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आढाळा - बहुला रस्त्यालगतच्या शेतातील झाडाला पहाटेच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. काही नागरिकांनी पाहिल्यानंतर ही घटना सकाळी उघडकीस आली. तलाठ्यांनी पंचनाम्यात नापिकी व कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.मुलगा बालाजी यांच्या नावे बँक आॅफ इंडियाचे एक लाख रुपयांचे कर्ज आहे. वायसे यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून घटनेची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गिरधर ठाकूर करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...