आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातोड्याने पत्नीचे डोके फोडून शेतकऱ्याने घेतला गळफास, पीक करपल्याने अडकले होते आर्थिक विवंचनेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिराढोण - पावसाअभावी शेती करपली, कृषिपूरक व्यवसायातही तोटा झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शिराढोण (ता. कळंब) येथील शेतकऱ्याने पत्नीच्या डोक्यात हातोडीने वार करून तिला ठार केले व नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी (दि. १३) पहाटेच्या दरम्यान घडला. सकाळी वडील आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आईला सांगण्यासाठी मुलगा ती झोपलेल्या ठिकाणी गेला, मात्र तीही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. 


रामभाऊ गुलाब यादव (५०) यांची शिराढोण शिवारात तीन एकर शेतजमीन आहे. त्यांना तीन मुले असून त्यापैकी दोघांची लग्ने झालेली आहेत. रामभाऊ, त्यांची पत्नी सीताबाई यादव (४५) व पप्पू नावाचा विवाहित तसेच अविवाहित असलेला मुलगा अभिजित हे एकत्र राहत होते. शंकर यादव हा सर्वात मोठा मुलगा आपल्या पत्नीसह विभक्त राहत आहे. 


रामाभाऊ यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेतातच कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय सुरू केल्यापासून वर्षभर त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत होते. परंतु कालांतराने या व्यवसायात त्यांचा तोटा होत गेला. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांना गवंडीकामही करावे लागत होते. परंतु वयानुसार त्यांना गवंडीकामही होत नव्हते. या वेळी पावसाने ओढ दिल्याने शेतीतूनही काहीच निघाले नाही. व्यवसायही मोडकळीस आला. उसनवारी व काही बँकेचे कर्ज कसे फेडायचे यामुळे रामभाऊ वैफल्यग्रस्त झाले हाेते. 


शेतकऱ्याने बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. या घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस. दुसऱ्या छायाचित्रात मृत रामभाऊ यादव आणि सीताबाई यादव. 

 

मनात नैराश्याची भावना 
नेहमीप्रमाणे रामभाऊ यांनी शुक्रवारी रात्री जेवण केले. नंतर पत्नीसह ते कुक्कुटपालनासाठी उभारलेल्या शेडमध्ये रात्री झोपण्यास गेले. मुलगा अभिजितने त्यांना शेडपर्यंत सोडले. त्यानंतर रामभाऊ यांनी अभिजितला घरी जाण्यास सांगितले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती करपली, गवंडीकामही होत नव्हते. कुक्कुटपालनाचा व्यवसाय डबघाईला आला. यामुळे रामभाऊ यांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण झाली. यातून त्यांनी गवंडीकामासाठीचा हातोडा उचलला. त्यांनी त्याच हातोड्याने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात वार केले. यात पत्ती सीताबाई क्षणातच गतप्राण झाल्या. त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यावर १०० फुटांवर असलेल्या बाभळीच्या झाडाला रामभाऊ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरापर्यंत येथील ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...