आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या विवाहाची चिंता अन् दुष्काळाने घेतला आणखी एका शेतकऱ्याचा बळी; राहत्या घरीच प्राशन केले कीटकनाशक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पापरी (ता. मोहोळ)- नापिकी व मुलीच्या विवाहाच्या चिंतेने एका 47 वर्षीय शेतकर्‍याने वस्तीवर कीटकनाशक प्राशन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनंत शंकर शिंदे असे या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनंत  शिंदे यांनी राहत्या घरी जीवन यात्रा संपविली.
 
मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अनंत शिंदे यांना मुलगी असून ती विवाह योग्य झाली आहे. जमीन नापीक असल्याने मुलीच्या विवाहाची चिंता सतावत असल्यामुळे अनंत यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या केल्यानंतर तातडीने त्यांना मोहोळ येथील ग्रामीण रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

प्रतीक अनंत शिंदे याने मोहोळ पोलिसात तक्रार दिली असून पोलिस या घटनेची तपासणी करत आहे.
बातम्या आणखी आहेत...