आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरजगाव कसबा- जवळपास २० ते २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र असे असतानाच दुसरीकडे मुसळधार पावसाने शिरजगाव कसबा येथील डोबानपुरा भागात घराची भिंत कोसळल्याचे पाहून ६२ वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घडली. अशोक श्यामराव शेकोकार असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे येथील मेघा नदीला पूर आला. पुराचे पाणी गावातील काही भागांमध्ये घुसल्याने घरांचे नुकसान झाले. त्यातच पुराच्या पाण्यामुळे गावातीलच डोबानपुरा येथील रहिवासी अशोक शेकोकार यांच्या घराची माातीची भिंत कोसळली. भिंत पडल्याचे पाहून त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अडीच एकर शेती व विहिरीतील मोटार दुरुस्तीचा व्यवसाय करून ते आपला प्रपंच चालवित होते. त्यांचा पश्चात पत्नी, मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
दुसऱ्या दिवशीही पाऊस मेहेरबान
जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावली. गुरूवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज (दि. १७) दिवसभर सुरू होता. अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यात मुसळधार पाऊस आल्याने प्रथमच नदी, नाल्यांना पूर आला. शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत होता. जिल्ह्यात सर्वदूर पावसाची झडी कायम होती. पावसामुळे शहरातील जनजीवन ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले होते. गुरूवारीही शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.