दुर्घटना / साताऱ्यात गणपतीची सजावट करताना शॉक लागून शेतकर्‍याचा मृत्यू

ऐन गणेशोत्सवाच्या काळात कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Sep 01,2019 05:45:00 PM IST

सातारा - गणपतीच्या सजावटीची तयारी करत असताना शॉक लागून हणमंत मुगुटराव साबळे (वय 55, रा. साबळेवाडी, ता. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशाच्या आगमनाची सध्या घरा-घरात जय्यत तयारी सुरू आहे. साबळेवाडीतील हणमंत साबळे हे सुद्धा आपल्या घरात शनिवारी रात्री गणेश मूर्तीसाठी सजावट करत होते. यावेळी अचानक त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते बेशुद्ध पडल्याचे समजून कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ऐन गणेशोत्सवाच्या आगमनात साबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हणमंत साबळे हे शेती करत होते, असे पोलिसांनी सांगितले.

X