आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात खोदकाम करताना दिसला मोठा दगड, सरकवताच सापडले पिरॅमिडपेक्षा प्राचीन शहर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्कनी - स्कॉटलंडचे बेट आर्कनी येथे जमीनीखाली एक अख्खे प्राचीन शहर आहे. या शहराचा शोध शेतकऱ्याला दैनंदिन काम करतानाच लागला होता. शेतात काम करत असताना त्याला एक खड्डा दिसून आला. त्या खड्ड्याला लागूनच काही दगड होते. हे दगड हटवताच त्या शेतकऱ्याला चक्क द्वार दिसून आला. या दारामागे नक्कीच खजिना असेल असे त्या शेतकऱ्याला वाटले. परंतु, त्याने जेव्हा दार उघडले तेव्हा अख्खे शहर त्याला दिसून आले. हे शहर खजिन्यापेक्षा मोल्यवान होते. प्रत्यक्षात, हे शहर 5000 वर्षांपूर्वीचे आहे. कित्येक वर्षांपासून सकरा ब्रे नावाचे शहर अचानक गायब झाले अशी मान्यता होती. त्याच शहराचा शोध या शेतकऱ्याला लागला.


पिरॅमिडपेक्षा प्राचीन शहर
सकरा ब्रे नावाचे हे शहर इजिप्तच्या पिरॅमिडपेक्षा प्राचीन आहे असे मानले जाते. पुरातत्ववेदतांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 हजार वर्षांपूर्वी वाळवंटी तूफानात हे शहर दबले होते. शेतकऱ्याने वेळीच या शहराची माहिती इतर गावकऱ्यांना दिली. आणि पाहता-पाहता हे वृत्त अख्ख्या जगात पसरले. हे शहर एक छोटे आणि भूलभुलैय्यासारखे आहे. यात जाणे जितके कठिण बाहेर निघणे तेवढेच अवघड आहे. तज्ज्ञांच्या मते, या शहराची निर्मिती इ.स.पू. 3180 मध्ये झाली असावी.

बातम्या आणखी आहेत...