आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेस डेस्क - कमीत कमी गुंतवणुकीतून लाखो रुपये कमविण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. डोक्यात विविध व्यवसाय करण्याच्या आयडिया येतात. परंतु, यश मिळेल याची गॅरन्टी नसते. पण, आपल्याकडे शेतीजमीन असल्यास या विशेष काकडीचा व्यवसाय आपल्यासाठी फायद्याचा ठरू शकते. ही काकडी आपल्याला अवघ्या 4 महिन्यांत लाखोंचा नफा मिळवून देऊ शकते. एका लाखाच्या गुंतवणुकीत एका शेतकऱ्याने फक्त 4 महिन्यांत 8 पट नफा मिळवला. त्याचीच ही यशोगाथा आहे.
4 महिन्यांत मिळवले 8 लाखांचे उत्पन्न
राजस्थानच्या रसीदपूरा येथील शेतकरी दुर्गाप्रसाद ओला यांनी काकडीच्या शेतीतून 4 महिन्यात 8 लाख रूपये उत्पन्न मिळवले आहे. दुर्गाप्रसाद यांनी शेतात नेदरलँडच्या काकडीचे उत्पन्न घेतले. त्यांच्या मते नेदरलंडवरून बियाणे मागवणारे ते राजस्थानातील पहिले शेतकरी आहेत. या काकडीमध्ये बिया नसतात यामुळे मोठमोठे हॉटेल्स आणि रेस्त्रॉमध्ये याला मोठी मागणी असते. दुर्गाप्रसाद यांनी उद्यान विभागाकडून 18 लाखांच्या अनुदानावर शेतामध्ये एक शेडनेट हाउस उभे केले होते. अनुदान व्यतिरिक्त त्यांना स्वत:ला 6 लाख रूपये खर्च करावा लागला. त्यानंतर नेदरलँड येथून 72 हजारांचे बियाणे मागविले. बियाणांच्या लागवडीच्या 4 महिन्यानंतर त्यांनी 8 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले.
पुढे आणखी वाचा....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.