आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळुरू(कर्नाटक)- नारळाच्या आणि सुपारीची झाडे एकदम सरळ आणि चिकणी असल्यामुळे त्यांच्यावर चढणे अवघड काम असते. त्यामुळेच शेतकरी यांची शेती करण्यापासून घाबरतात. पण आता या झाडांवर चढणे सोपे झाले आहे, कारण कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये राहाणारे शेतकरी गणपती भट्ट यांनी झाडांवर चढण्यासाठी खास गाडी बनवली आहे. या गाडीचे वजन 28 किलो आहे आणि ही गाडी 60 ते 80 किलोमीटरच्या वेगाने झाडावर चढू शकते. एका लीटर पेट्रोलने जवळपास 80 झाडांवर चढण्याची क्षमता या गाडीची आहे.
या गाडीची खास बाब म्हणजे 80 किलोच्या माणसाला घेऊन ही गाडी वर चढू शकते. पावसाळ्याच्या दिवसात नारळ आणि सुपारीच्या झाडांवर किडं लागण्याची भीती असते. त्यामुळे झाडांवर किटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे. किटकनाशक घेऊन या झाडांवर चढणे अतिशय अवघड काम आहे.
30 सेकंदात गाडी झाडावर चढते
गणपती यांनी या गाडीला बनवण्याचे काम एका आव्हान म्हणून पेलले आणि त्यांनी ही गाडी बनवली. त्यांनी दावा केला आहे की, फक्त 30 सेकंदात ही गाडी झाडाच्या शिकरापर्यंत पोहचते. सध्या या झाडांवर पोहचण्यासाठी साधारण 10 मिनीटांचा वेळ लागतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.