आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड- हदगाव तालुक्यातील माळझरा येथील गजानन गंगाधर कारले (वय २२) या तरुण शेतकऱ्याने नापिकी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून आत्महत्या केली. गेल्या चार दिवसांतील ही चवथी शेतकरी आत्महत्या आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून गजाननने सोमवारी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
लोहा तालुक्यातील वेळी येेथील दत्ता एकनाथ सोमवारे (३७), भोकर तालुक्यातील मसलगा येथील शिवाजी देवराव हाके, मुखेड तालुक्यातील यशवंत व्यंकटराव धुळगंडे (२८) या तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनंतर हदगाव तालुक्यात अजून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या वर्षी सगळा खरीप हंगाम धुवून नेला. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांत तीव्र नाराजीची भावना आहे. सरकार केव्हा कर्जमाफी करेल याबाबत शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातून शेतकरी आता टोकाचा विचार करीत असल्याचे गेल्या चार दिवसांत झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून दिसून येते. दुर्दैवाने हे चारही शेतकरी तरुण वयोगटातले आहेत. तरुण शेतकऱ्यांनी पत्करलेला हा मार्ग सामाजिक चिंतेचा विषय ठरला आहे.
सरकार शिवाय जगा
सरकार कोणाचेही असो शेतकऱ्याचे मरण ते सरकारचे धोरण हे ठरलेले आहे. पण सरकार बदलल्यामुळे थोडीशी अपेक्षा सरकारकडून ठेवली. परंतु हे सरकार त्याबाबत पूर्ण अपयशी ठरले आहे. सरकारशिवाय कसं जगता येते हे शेतकऱ्यांना पहावे लागेल. गुणवंत पाटील हंगरगेकर, शेतकरी संघटना नेते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.