Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Farmer killed in leopard attack in paithan

​बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार; मृतदेह अाेढत नेत धड केले शरीरापासून वेगळे

प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 06:45 AM IST

पैठण तालुक्यातील गोपेवाडी शिवारात आनंदपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात भारत मुरलीधर ठाणगे (वय ५६) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला

  • Farmer killed in leopard attack in paithan
    पैठण- पैठण तालुक्यातील गोपेवाडी शिवारात आनंदपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात भारत मुरलीधर ठाणगे (वय ५६) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ठाणगे हे गुरूवारी सायंकाळी उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. याच दरम्यान शेतवस्तीवर बिबट्या अाल्याची माहिती अन्य गावातील एका शेतकऱ्याने लाेकांना दिली. त्यामुळे सुमारे ५० लाेकांचा जमाव शेतवस्तीवर गेला. तिथे त्यांना भारत ठाणगे हे मृतावस्थेत आढळून आले. हा मृतदेह गावात नेण्यासाठी ग्रामस्थ वाहन अाणण्यासाठी जात असताना बिबट्याने पुन्हा येऊन मृतदेह अाेढत नेत त्याचे धड शरीरापासून वेगळे केले. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले हाेते.

Trending