आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-याने पत्नी-मुलाला मारून डोक्यात गोळी झाडली; शेजारी धावून आले तेव्हा भीतीने लपून बसली होती 7 वर्षांची मुलगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - पंजाबच्या भटिंडा येथे एका शेतकऱ्याने आपल्या पत्नी आणि अवघ्या 11 महिन्यांच्या मुलाला गोळ्या घालून ठार मारले. यानंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकूण शेजारी घरात धावून गेले. तेव्हा पत्नीचा मृत्यू झाला होता. तसेच शेतकरी आणि त्याचा 11 महिन्यांचा मुलगा श्वास घेत होते. त्या दोघांनाही अतिशय गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना डॉक्टरांना मुलाला देखील मृत घोषित केले. तर शेतकऱ्याची अवस्था अजुनही गंभीर आहे. 
 

Firing चा आवाज ऐकूण लपली अन् वाचली 7 वर्षांची मुलगी
भटिंडा जिल्ह्यातील ख्याला कला गावात राहणाऱ्या मलकीत सिंगने सांगितल्याप्रमाणे, जगबीर सिंग (45) च्या आईला कर्करोग आहे. तिची अवस्था आणि उपचारामुळे तो नैराश्यात गेला होता. रविवारी सकाळी 8 वाजता जगबीरने आपल्या पिस्तुलने पत्नी गुरप्रीत कौर आणि 11 महिन्यांचा मुलगा हॅरीवर गोळ्या झाडल्या. यानंतर त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी घातली. आई आणि लहान भावावर गोळीबार होत असताना त्यांच्या किंकाळ्या ऐकूणच जगबीरची 7 वर्षांची मुलगी नूरप्रीत लपून बसली होती. त्यामुळेच, तिचा जीव वाचला आहे. या घटनेत पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर आरोपी पतीची अवस्था चिंताजनक असल्याने त्याला लुधियाणा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक तपासात जगबीरनेच हे कृत्य केल्याचे दिसून येते. तरीही घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे. 
 

जगबीरवर हत्येचा गुन्हा दाखल
मृत्यूमुखी पडलेल्या गुरप्रीतचे वडील राजपाल सिंग यांनी आपल्या जावयावर नेहमीच दारु पिऊन मारहाण करण्याचे आरोप लावले आहेत. गुरप्रीत आणि जगबीर यांचा विवाह 11 वर्षांपूर्वी झाला होता. त्याने केवळ पत्नीच नव्हे, तर मुलांना देखील रोज त्रास देण्यास सुरुवात केली होती. रोज होणाऱ्या वादातूनच त्याने आपल्या पत्नी आणि मुलाचा खून केला अशी तक्रार त्यांनी पोलिसांत दाखल केली आहे. 


कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचा नेता होता जगबीर
जगबीर सिंग आपल्या पत्नी, 11 महिन्यांचा मुलगा आणि 7 वर्षांच्या मुलीसह आई-वडिलांसोबत राहत होता. जगबीर सिंग कॉलेजला असताना विद्यार्थी संघटनेचा नेता होता. त्याने ड्रायव्हिंग टीचरचा कोर्स देखील केला होता. परंतु, आपल्या गावात शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याचे वडील सुरजीत सिंग सरकारी शाळेत शिक्षक आहेत. तर मोठा भाऊ वकील आहे. घटनास्थळी सापडलेली पिस्तुल वैध होती आणि परवाना जगबीरच्या नावाने होता.

बातम्या आणखी आहेत...