आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कर्जमाफी म्हणजे जखम गुडघ्याला अन् पट्टी डोक्याला, बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांच्या कानफटात मारू, बच्चू कडू यांचा इशारा
  • कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, आजवर २१ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

नागपूर - मुख्यमंत्री चांगले निर्णय घेत आहेत. मात्र, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा समस्येवरील उपाय नाहीच. कर्जमाफीचा निर्णय म्हणजे जखम गुडघ्याला अन् पट्टी डोक्याला असा हा प्रकार असल्याचे सांगत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला. कर्जमाफीच्या मुद्द्यावर कुठलाही बँक अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर त्याच्या कानफटात लगावणार, असा इशाराही त्यांनी नागपुरात दिला. ते  म्हणाले, शेतमालास हमीभाव हे या समस्येवरील प्रभावी उत्तर आहे. मोदींनी शेतकऱ्यांना ५०% नफा धरून हमीभावाची घोषणा केली. ती अमलात आलेली नाही. त्यामुळे आजही शेतकरी आहे, त्याच स्थितीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन या समस्येवर तोडगा काढला पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर 
 
मुंबई | शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी शनिवारी प्रसिद्ध झाली. सहकार विभागाने आजवर २१ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. शनिवारपर्यंत १ लाख ४३,६७२ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले. रविवारी सुटीमुळे सोमवारपासून बँक खात्यांत पैसे जमा होतील. १५ जिल्ह्यांत पूर्णपणे, तर १३ जिल्ह्यांत ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने अंशतः याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.  

बातम्या आणखी आहेत...