आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट काळ येतो, परंतु असेच लोक टिकतात जे आधीपासून तयारी करतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे भरपूर शेती होती परंतु काम करणारे लोक नव्हते. कारण त्या गावात सारखे वादळ यायचे आणि संपूर्ण पीक नष्ट व्हायचे. वादळामुळे दुसऱ्या दिवशी लोकांना जास्त काम करावे लागत होते. शेतकऱ्याने अनेक गडी कामासाठी ठेवले परंतु एक-एक करून सर्वजण पळून गेले. 
 

> एके दिवशी शेतकऱ्याने शहरात जाऊन वर्तमानपत्रामध्ये शेतीसाठी काम करणारा गडी हवा आहे अशी जाहिरात दिली. ही जाहिरात वाचून अनेक लोक आले परंतु या गावात सारखे वादळ येतात आणि जास्त काम करावे लागते हे समजल्यानंतर कोणीही काम करण्यासाठी तयार झाले नाही.


> काही दिवसांनी एक तरुण शेतकऱ्याकडे आला आणि म्हणाला मी तुमच्याकडे काम करण्यासाठी तयार आहे परंतु माझी एक अट मान्य करावी लागेल. शेतकऱ्याने अट विचारली, तरुण म्हणाला जेव्हा-जेव्हा जोरात हवा सुटते तेव्हा मी झोपी जातो आणि मला झोपेतून उठवू नये.

> शेतकरी ठीक आहे म्हणाला. तरुण शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करू लागला. तो सर्व काम वेळेवर आणि चांगल्याप्रकारे करत होता. एका संध्याकाळी वादळ येत असल्याचे शेतकऱ्याने पाहिले आणि तो धावत मुलाकडे गेला. मुलगा खोलीत झोपलेला होता. शेतकऱ्याने त्याला उठवले आणि म्हणाला वादळ येणार आहेर, बाहेर जोराचा वारा सुटला आहे. आपल्याला शेतात जाऊन काहीतरी करावे लागेल.


> मुलगा म्हणाला - मी तुम्हाला आधीच सांगितले होते की, जोराचा वारा सुटल्यानंतर मी झोपतो, मला उठवू नका. मुलाचे उत्तर एकूण शेतकऱ्याला खूप राग आला आणि तो एकटाच धावत शेताकडे गेला. तेथे पोहोचल्यानंतर त्याला शेतामध्ये पिकाच्या पेंड्या बांधून ठेवलेल्या दिसल्या. सर्वकाही ठीक होते. वादळ आले तरी कोणतेही नुकसान होणार नव्हते. हे पाहून शेतकरी त्या मुलाच्या हुशारीवर खुश झाला.


लाईफ मॅनेजमेंट
सर्वांच्या आयुष्यात चढ-उतार येत-जात राहतात. काही लोक वाईट परिस्थितीमध्ये कोलमडतात तर काही धाडसाने संकटाचा सामना करतात. ते लोक यामुळे असे करू शकतात कारण वाईट परिस्थितीवर मात करण्यासाठी ते आधीपासूनच तयार राहतात. उदा. प्रत्येक महिन्याला छोटी-छोटी केलेली बचत योग्य वेळेला तुमच्यासाठी मोठा आधार ठरू शकते.

बातम्या आणखी आहेत...