आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीसोबतचा वाद सोडवल्याचा राग; सालदाराने केली शेतमालकाची हत्या, डोक्यात घातला लोखंडी रॉड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पत्नीसोबत सुरू असलेला वाद सोडवल्याचा राग आल्याने सालदाराने वृद्ध शेतमालकाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांला तालुक्यातील वडनगरी येथे घडली. घटना घडल्यानंतर सालदार फरार झाला. प्रभाकर शंकर पाटील (75, रा. वडनगरी, ता.जळगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे, तर शांताराम बाबूलाल पावरा (35, रा. वडनगरी) असे आरोपी सालदाराचे नाव आहे.

 

सोमवारी दुपारी सालदार शांताराम हा दारूच्या नशेत पत्नीसोबत भांडण करत होता. रागाच्या भरात तो कोयता घेऊन पत्नीच्या मागे धावत होता. या वेळी शेतमालक पाटील यांचे नातू गजानन यांनी शांताराम याला पकडले. ‘पत्नीस मारू नकोस’, असे सांगत असताना शांतारामने थेट गजानन यांच्यावर वार केले. त्याने गजानन यांच्या डोक्यात व पायावर कोयता मारला. यांनतर तो शेतातून पळून गेला होता. गजानन यांना मार लागल्याने ते रुग्णालयात गेले. जखम गंभीर नसल्यामुळे तसेच शांताराम हा त्यांच्याचकडे कामाला असल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार न करता हे प्रकरण मिटवले. यानंतर दिवसभर शेतात कोणीच नव्हते. शांताराम याची पत्नीदेखील भावाकडे निघून गेली होती. शेतात गुरांची राखण करण्यासाठी प्रभाकर पाटील हे स्वत: रात्री शेतात येऊन झोपले. शांताराम हा देखील मध्यरात्री दारूच्या नशेत शेतात आला. दुपारी पत्नीशी झालेल्या भांडणाचा राग त्याच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने शेतात झोपलेल्या प्रभाकर पाटील यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून जागेवरच त्यांना ठार केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...