आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: 3 दिवसांपासून नदीच्या मध्यभागी अडकला होता शेतकरी, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करुन वाचवले प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ललितपुर(यूपी): ललितपुरमध्ये पुरामुळे तीन दिवसांपासून एक शेतकरी नदीमधील बेटावर अडकलेला होता. त्याला शनिवारी सैन्याने हेलिकॉप्टरने रेस्क्यू करुन वाचवले. शेतकरी हा खुप उपाशी होता. त्याने नदी काठी येताच पोटभर जेवण केले. यानंतर त्याने आपले प्राण वाचवण्यासाठी सैन्याचे आभार मानले. 


पुरामध्ये अडकला होता शेतकरी 
- सध्या जनपचे प्रमुख बांध राजघाट, गोविंद सागर, सहजाद, जामनीसोबतच माताटीला हे सर्व पाण्यातने तुटूंब भरलेले आहे. यामुळे नदीला पुर येत आहे.
- ज्या नदी काठांवर शेतक-यांचे पीक आहेत, ते सर्व शेतकरी चिंतेत आहेत. पिकांसाठी शेतकरी आपले प्राण धोक्यात घालत आहेत.
- तालबेहट येथील कडेसरा कलां येथे राहणारा 45 वर्षीय शेतकरी मुसळधार पावसात आपले पीक पाहण्यासाठी नदीच्या काठावर गेला होता.
- याचवेळी माताटीला बांधाचे गेट अचानक उघडल्यामुळे तो शेतकरी बेटावर अडकला. हे वृत्त गावात पसरताच याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली.
- यानंतर सैन्याच्या मदतीने शनिवारी हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन करत त्याचे प्राण वाचवण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...