Home | Editorial | Columns | farmer-revolution-market

चौथ्या क्रांतीचा दुवा : शेतकरी

सुनील तांबे, मार्केट लाइटचे संपादक | Update - May 30, 2011, 08:36 PM IST

तंत्रज्ञानामुळे आता कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या चौथ्या क्रांतीने जगाचा ताबा घेतला असून, याच चौथ्या क्रांतीने शेतक :यांचे जीवनही आमूलाग्र बदलून टाकण्यास प्रारंभ केला आहे...

 • farmer-revolution-market

  फ्युचरॉलॉजिस्ट म्हणजे ज्योतिषी नव्हे, तर विज्ञान-तंत्रज्ञान आणि सामाजिक-सांस्कृतिक नि आर्थिक वास्तवाचा आढावा घेऊन भविष्याचा वेध घेणारे जिनियस. एल्विन टॉफ्लर या आद्य फ्युचरॉलॉजिस्टने 'थर्ड वेव्ह' या ग्रंथात म्हटले होते, की जगातली पहिली क्रांती कृषी क्रांती होती. ह्या क्रांतीची लाट आशियातून युरोपकडे गेली. तर दुसरी क्रांती औद्योगिक क्रांती. ही पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरत गेली. तिसरी क्रांती उत्तर औद्योगिक क्रांती अर्थातच माहिती तंत्रज्ञानाची क्रांती. याच तंत्रज्ञानामुळे पुढे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची चौथी लाट जगभर पसरत गेली. औद्योगिक क्रांती आणि उत्तर औद्योगिक क्रांती या दोन लाटांनी जगाला कवेत घेऊनही समाजातील अनेक घटक कृषी क्रांतीच्या लाटेवरच हेलकावत होते. मात्र आता, तंत्रज्ञानाच्या चौथ्या क्रांतीने शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवायला सुरुवात केली आहे.
  मोबाइल फोन केवळ करमणुकीसाठी वा मन रिझवण्यासाठीच नाही तर माहितीच्या प्रसारणासाठीही वापरता येईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेची अचूक माहिती मिळेल, शेतमालाच्या भावात होणा:या चढ-उतारांची केवळ माहितीच नव्हे, तर कारणे कळतील, जेणेकरून केव्हा आणि कुठे शेतमालाची विक्री करायची याचा निर्णय शेतकरी घेऊ शकेल, या विचाराने रॉयटर्स मार्केट लाइट- आरएमएल ही कंपनी शेतकऱ्यांना मोबाईलवर बाजारभाव, पीक-सल्ला, हवामान आणि बातम्या ही माहिती देत आहे. २७ साली महाराष्ट्रात या सेवेची सुरुवात करण्यात आली.आजघडीला देशातील १३ राज्यातले हजारो शेतकरी ह्या सेवेचा अविरत लाभ घेत आहेत.
  जगन्नाथ बाबुराव सुरासे हा जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री गावचा एक तरुण शेतकरी. कापसाला चांगला भाव मिळाल्याने गावातले बहुसंख्य शेतकरी माल विकून टाकत असताना सुरासे यांनी मात्र धीर धरला. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या मागणीमुळे कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आरएमएलच्या एसएमएस बातमीने त्यांना सांगितली होती. योग्य वेळी माल विकल्याने त्यांना एकूण ६ हजार रुपये जादा मिळाले. मोसंबीच्या बाबतीतही बातम्यांमधून मार्केटचा अचूक ट्रेन्ड कळल्याने प्रति क्विंटल पाचशे रुपये असे एकूण २४ हजार रुपये जास्त मिळाले. मोबाईलवर मेसेज वाचून त्यानुसार निर्णय घेणारे आणि त्यातून फायदा मिळवणारे जगन्नाथ हे एकमेव शेतकरी नाहीत. मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातले पुंडलिक कलमे असोत, सातारा जिल्ह्यातले दौलतराव बारकडे असोत, नाशिकचे मधुकर क्षीरसागर असोत की यवतमाळचे सुदर्शन मोहनूर असोत... असे हजारो शेतकरी सध्या आपल्या शेतीतले रोजचे निर्णय घेण्यासाठी मोबाईलवर येणाऱ्या मेसेजवर विसंबून आहेत. मेसेज वाचून द्राक्षबागेवर डाऊनीसाठीचे औषध फवारल्यामुळे साडेतीन लाखांचा फायदा झाल्याचे सावळज (ता. तासगाव, जि. सांगली)चे बंडू देसाई यांनी सांगितले.
  शेतमालाच्या ङ्क्षकमती ही शेतीची आणि आयुष्याचीही गणिते मोठ्या प्रमाणावर बदलून टाकणारी संवेदनशील बाब असते. मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम करणाऱ्यां अनेक बाबी असल्याने शेतमालाच्या दरात सतत चढ-उतार होत असतात . शेतमालापासून तयार होणाऱ्यां पक्क्या मालाला असणारी मागणी आणि मिळणारा भाव यावर शेतमालाचे दर ठरतात. देश आणि जागतिक पातळीवरच्या घडामोडी, धोरणे, व्यापार, आवक, मार्केट ट्रेन्ड यांचा त्यावर थेट परिणाम होतो. आरएमएलच्या सभासद शेतकाऱ्यांना ही माहिती २४ तासांच्या हवामान अंदाजासह त्यांच्या मोबाईलवर, स्थानिक भाषेत नियमित मिळत आहे.
  आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळायचा असेल तर आपल्या शेतातल्या सोयाबीनबरोबरच अर्जेन्टिना, ब्राझील, अमेरिकेत या पिकाची स्थिती काय आहे, यावरही नजर ठेवणे गरजेचे ठरते, हा विचार आरएमएलच्या बातम्यांमुळे शेतकऱ्यामध्ये चांगलाच झिरपला आहे. आरएमएलच्या बातम्यांचे मेसेज मिळाल्याने वेळेवर खते मिळवणे शक्य झाले. लातूर जिल्ह्यात सरकारचा एकही पैसा खर्च न करता लोकसहभागातून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविल्याची बातमी मोबाईलवर वाचून शेकडो शेतकऱ्यानी आपल्याशी थेट संपर्क साधल्याचा अनुभव तिथले तरुण जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी कळवला. अरुण कराळे (मु.पो. अकोट, जि. अकोला) यांनी क्षारपड जमिनीच्या सुधारणेसाठी केलेल्या प्रयोगाची माहिती वाचून साडेचारशे लोकांनी त्यांना फोन केला. राज्याचे कृषिमंत्रीही पाहणी करायला आले. मराठवाड्यात कृषी विभागाने बीडच्या साई कृषी शेतकरी मंचाची मदत घेऊन हळदीच्या समूह शेतीचा उपक्रम सुरू केला. त्याची आरएमएलने दिलेली बातमी वाचून २-२५ शेतकऱ्यानी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यातून १२ गावांत शेतकऱ्यांचे समूह तयार करून हळदीच्या लागवडीची तयारी सुरू आहे, असे मंचाचे अध्यक्ष नाथराव कराड (मु.पो. इंजेगाव, जि. बीड) सांगतात.
  शेतकऱ्याना शेतमालाच्या किमती कळल्या तरच शेती फायद्याची ठरणार आहे. ज्या मोसमात शेतमालाच्या किमती वाढतात त्या मोसमापूर्वीच उत्पादन हाती येईल असे नियोजन शेतकरी करू शकतात. यंदा जेवढे भाव आहेत, त्यात पुढील वर्षी वाढ होणारच आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादनखर्चाचेही नियोजन करू शकतात. थोडक्यात, आरएमएलचा शेतकऱ्याना केंद्रस्थानी ठेवून राबवलेला प्रयोग क्रांतिकारी ठरला आहे. मोबाईलवरच्या बातम्यांमुळे शेतकरी आता जगाशी जोडले गेले आहेत, याचा आरएमएल साक्षीदार आहे. तांबडे फुटायला सुरुवात झालीय, याचीच ती आश्वासक खूण आहे...
  या सेवेच्या विनामूल्य वापरासाठी शेतकऱ्यांना १८२७८९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Trending