आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचे भीषण वास्तव - शेतकऱ्याने जनावरांच्या चारा-पाण्यासाठी बायकोचे दागिणे ठेवले गहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दुष्काळाची दाहकता काय सांगू ताई गावात काम मिळत न्हाय, पाणी न्हाय, कोरडवाहू जमीन पिक बी आल न्हाय. जनावराच्या चारा पाण्यासाठी बायकोचे दागिणे, मंगळसूत्र गहाण ठेवलया. असा दुष्काळ पाहायला न्हाय. काय कराव समजत न्हाय. कसं होईल. अवंदा शेती करायची ताकद न्हाय. ही व्यथा आहे पालखेड येथील ६५ वर्षांच्या बाळू कारभारी शेतकरी यांची ही केवळ यांच्या एकट्याचीच स्थिती नाही. तर औरंगाबाद जिल्हयातील दुष्काळ जाहिर केलेल्या गावातील शेतकऱ्यांची स्थिती आहे.

 

औरंगाबाद शहरापासून ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर असलेले पालखेड गाव. या गावाची लोकसंख्या आठ ते दहा हजार आहे. गावातील ९० टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. पण गेल्या दोन वर्षापासून पाऊसच नाही. मागील वर्षी कसबस तगल. पण यंदा मात्र पावसान दडी मारली. त्यामुळे आधीच कोरडवाहून असलेल्या पावणेचार एक्कर जमीन काही बी आलं न्हाय असं बाळु कारभारी म्हणाले. कपाशी, मका आणि ज्वारी पेरली होती.पण सगळ नुकसान झाल. प्यायला पाणी नाही, पिक वाया गेली. चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांची चिंता आहे. तीस हजार रुपये कर्ज काढलं. ते माफ झाल पण पुन्हा कर्ज काही मिळाल नाही. पिक झाल नाही. पण आहे ती जनावर विकायची वेळ येवू नये. म्हणून विकत चारा-पाण्याची व्यवस्था करावी लागते आहे. पण माझ्या घरात आम्ही चार जण त्यात पिक झालं न्हाय म्हणून खाण्याचे वांदे आहे. धान्य विक घ्याव लागतय. बायको कांदे सोलायच्या कामाला कोपरगावात जातीये. चारा पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून बायकोचे जे एक दोन तोळा सोन मोठ्या कष्टानं केल होत ते गहाण ठेवल्याच कारभारी यांनी सांगितले. 

 

गावात टँकर येत पण ते देखील आठ - दहा दिवसातून एकदाच. इतके मोर्चे निघाले पण शेतकऱ्यांचे प्रश्न काही मार्गी लागत नाही. आता तर काय निवडणूका आल्यात. यात सर्व नेते मंडळी आपली पोळी भाजून घेतील. गरीब शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही. अशी खंतही कारभारी यांनी व्यक्त केली. एका महिन्यात जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये टँकरवर खर्च होतो. त्यापेक्षा कायमस्वरुपी उपाय योजना करायला पाहिजेत असेही कारभारी म्हणाले.

 

पाणी भरण्यात जातो अर्ध्याहून अधिक वेळ - 
हल्ली मला पाण्याचच स्वप्न पडत. दिवसभरातला अर्ध्याहून अधिक वेळ हा पाणी भरण्यातच जातो.घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यामुळे दहावी नंतर शिक्षण थांबल. शिकण्याची खूप इच्छा आहे.पण पैसा आणायचा कुठून. जमीन नाही. रोजमजुरीवरच घर चालत. ही व्यथा आहे लासूर गावच्या जया संतोष सुपेकर या तरुणीची. तर तिचीच आठवीच्या वर्गात शिकणारी बहिण बोलायला अतिशय चतुर, आत्मविश्वासू रोहिणीला मात्र उन्हाळा आला की टेंशन येत. पाणी आणायच कुठून बऱ्याचवेळा शाळेला देखील पाणी आणण्यासाठी दांडी मारावी लागते. शाळेचा वेळ सकाळी १० ते ४ असल्यामुळे आता आम्ही बहिणी संध्याकाळी पाणी आणायला जातो. नेमकं जिथे दुष्काळाची दाहकता जास्त आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही या बहिणी सांगतात.

बातम्या आणखी आहेत...