आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक विवंचनेतून पोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्याची आत्महत्या; गेवराई तालुक्यातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई- सततची नापिकी, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणी यामुळे शेतकऱ्याने रविवारी पोळ्याच्या दिवशीच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील सुशी येथे घडली. या प्रकरणी मादळमोही पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


गंगाराम ऊर्फ (बबन)शामराव मुळक(४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सततच्या नापिकीला व दुष्काळी परिस्थितीला कंटाळून व मुलांच्या शिक्षणासाठी तसेच इतर खर्चासाठी जवळ पैसे नसल्याने गावातील मारुती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 


या प्रकरणी मादळमोही पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेचा पुढील तपास मादळमोही पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक अरविंद गटकुळ हे करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...