आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण शेतकर्‍याला सतावत होती बॅंकेचे कर्ज फेडण्याची चिंता, गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा- कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना हट्टी (ता.सिल्लोड) येथे मंगळवारी (दि.5) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. योगेश शेषराव जरारे (35) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकर्‍याचे नाव असून योगेशच्या वडीलाच्या नावावर सिल्लोड येथील एका बँकेचे असलेल्या कर्जाची परत फेड करण्याची चिंता योगेशला सतावत होती.

 

कर्जाच्या चिंतेत योगेश ने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सांडू जाधव, सावळे करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...