आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या; शेतातच संपवली जीवनयात्रा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जामोद- सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका साठ वर्षीय शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ९ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास तालुक्यातील जामोद येथे घडली. किसन तानू हातेकर रा.जामोद असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. 

 

किसन हातेकर यांच्याकडे पोटापुरती शेती असून, ते काबाडकष्ट करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते. काही दिवसापूर्वीच त्यांनी या शेतीवर विर्दभ कोकण ग्रामीण बँकेचे ६५ हजार रुपये कर्ज काढले होते. 

 

परंतु नापिकीमुळे डोक्यावरील कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. यातून कुठलाच पर्याय न सापडल्याने त्यांनी बुधवारी शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...