आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांची कर्जवसुलीची नोटीस चिठ्ठीत ठेवून शेतकऱ्याची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सायखेडा  (जि. नाशिक)  - नाशिक जिल्ह्यातील औरंगपूर (ता. निफाड) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी भाऊसाहेब खालकर (४४) यांनी त्यांच्या राहत्या घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीसोबत काही बँकांनी त्यांना जारी केलेल्या कर्जवसुलीच्या नोटीस ठेवल्या होत्या.  

   
भाऊसाहेब खालकर यांनी त्यांच्याकडील दोन एकर जमीनीवर त्यांनी द्राक्षबागेची लागवण केली होती. सलग मागील दोन  वर्षे नैसर्गिक आपत्तीनंतर यंदा बाग चांगली येऊनही कवडीमोल भाव मिळाला. त्यांच्यावर सायखेडा येथील देना बँकेचे ८ लाख, तर अाेझरच्या सरस्वती बँकेचे ८० हजार, सोसायटीचे ७० हजार, दुकानदारांचे १ लाख व उसनवारीने घेतलेले ९० हजारांचे कर्ज होते. देना बँकेची वारंवार नोटीस त्यांना येत होती. सरस्वती बँकेच्या वसुलीची गाडी दोन दिवसांपूर्वीच घरी अाली हाेती. उताऱ्यावर बँकेचे नाव लावू, असा सज्जड दम ते देऊन गेले होते. अशा परिस्थितीत आत्महत्येचा मार्ग स्वीकारून त्यांनी मरणाला कवटाळले.  त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...