Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | farmer suicide in taharabad news marathi

कर्ज कसे फेडू, फाशी घेत आहे...मित्रांना फोन करत शेतकऱ्याने कांदा चाळीत घेतला गळफास 

प्रतिनिधी | Update - Apr 11, 2019, 09:16 AM IST

बाळू अहिरराव यांची पाच एकर शेती आहे. शेतीसाठी त्यांनी एकता नागरी पतसंस्थेतून दोन लाख, एचडीएफसी बँकेतून १५ लाख तसेच खासगी

  • farmer suicide in taharabad news marathi

    ताहाराबाद - बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील शेतकरी बाळू धनाजी अहिरराव (वय ४२) यांनी बुधवारी दुपारी शेतातील कांदा चाळीत गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी मित्रांना फोन करून थकीत कर्जामुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले.


    बाळू अहिरराव यांची पाच एकर शेती आहे. शेतीसाठी त्यांनी एकता नागरी पतसंस्थेतून दोन लाख, एचडीएफसी बँकेतून १५ लाख तसेच खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्ज थकल्याने खासगी सावकार व बँकांकडून तगादा सुरू होता. त्यातच कांद्याला कवडीमोल भाव मिळाला. कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. बुधवारी दुपारी ते शेतात गेले. त्यांनी मित्रांना फोन करून सांगितले की, कांद्याला भाव नाही, पैशाची आशा नाही, कर्ज कसे फेडू, आता पर्याय नाही, मी फाशी घेत आहे, मला माफ करा, असे बोलून त्यांनी फोन कट केला.

Trending