Home | Maharashtra | Vidarva | Amravati | Farmer suicides by hanging in Worud taluka

दुष्काळाने घतला आणखी एका शेतकऱ्याच्या बळी; सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

प्रतिनिधी | Update - Dec 03, 2018, 11:28 AM IST

अत्यल्प पावसाने कपाशीची वाढ खुंटली, तर भारनियमनामुळे सिंचन न करता आल्याने कपाशी व संत्रा पिकाला बसला होता फटका .

  • Farmer suicides by hanging in Worud taluka

    वरुड- सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील जामगाव खडका येथे एका शेतकऱ्याने घरातील पंख्याच्या छताला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. शेषराव शामराव कडू(३६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

    याप्रकरणी बेनोडा शहीद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.जामगाव खडका येथील अविवाहित शेतकरी शेषराव कडू हे आई व लहान भावासोबत रहात होते. त्यांची बारगाव शेत शिवारात पाच एकर शेती असून त्यात त्यांनी कपाशी, ज्वारी,तूर, संत्र्याची लागवड केली. मात्र अत्यल्प पावसाने कपाशीची वाढ खुंटली, तर भारनियमनामुळे सिंचन न करता आल्याने कपाशी व संत्रा पिकाला फटका बसला. त्यातच त्यांच्यावर विविध बँकांचे व उसनवार असे जवळपास बारा लाखांचे कर्ज होते,अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. आई व भाऊ शेतात गेले होते. गतवर्षी वडिलांचे निधन झाले.

Trending