आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापिकी व मुलीच्या लग्नाच्या चिंतेने शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - शहरापासून जवळ असलेल्या खानापूर येथील एका शेतकऱ्याने गुरूवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. तुळशीराम मारोतराव जाधव (वय38) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शहरापासूनजवळच खानापूरनगर हे वसाहत असून या ठिकाणी तुळशीराम जाधव हे पत्नी, तीन मुली, मुलगा अशा परिवरासह वास्तव्यास आहेत. संपूर्ण कुटुंबाचा चरित्रार्थ शेतीवर चालत असे, मात्र शेतीत नापिकी झाल्याने उत्पन्न झाले नव्हते. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. मोठी मुलगी देखील लग्नास आल्याने तिच्या लग्नासाठी जवळ पैसा नसल्याची चिंता त्यांना भेडसावत होती. त्यातूनच गुरूवारी (दि.28) रात्री साडेअकरानंतर ते शुक्रवारी सकाळी आठच्या दरम्यान त्यांनी आपल्या राहत्या घरी टीनपत्र्याखाली असलेल्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. सकाळी आठ वाजता ही बाब उघडीस आली. त्यांचा सख्खा चुलत भाऊ जगन्नाथ लिंबाजी जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून नवा मोंढा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार टाकरस हे अधिक तपास करीत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...