Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Farmer suicides in Belvandi, due to Troubles of woman

महिलेच्या जाचाला कंटाळून बेलवंडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

प्रतिनिधी | Update - Aug 31, 2018, 11:44 AM IST

तालुक्यातील बेलवंडी येथील भाऊसाहेब कोंडीबा शेलार (वय ४८) या शेतकऱ्याने बुधवारी घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास

  • Farmer suicides in Belvandi, due to Troubles of woman

    श्रीगोदे- तालुक्यातील बेलवंडी येथील भाऊसाहेब कोंडीबा शेलार (वय ४८) या शेतकऱ्याने बुधवारी घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृताचा मुलगा प्रवीण याने दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी येथील एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.


    बुधवारी दुपारी गावातील काही जणांचे जोरदार भांडण झाले, अशी माहिती मिळताच प्रवीणने वडील भाऊसाहेब शेलार यांना आपल्या दुचाकीवरून घरी नेऊन सोडले. नंतर तो शेतामधील कामे करण्यासाठी गेला. दीडच्या सुमारास शेजाऱ्यांनी प्रवीणला फोन करून सांगितले की, तुझ्या वडिलांनी गळफास घेतला आहे. प्रवीणने घरी जाऊन पहिले असता वडील भाऊसाहेब मृतावस्थेत दिसले. त्याने याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात माहिती दिली. शेलार यांचा मृतदेह श्रीगोंदे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणला. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.


    याबाबत प्रवीण भाऊसाहेब शेलार याने फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले आहे, २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० ते ३ च्या सुमारास बेलवंडी गावातील धान्य गोदामाजवळ पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहारावरून कविता गिते या महिलेने वडिलांना चप्पल व दगडाने भरचौकात मारले. तू जर मला पैसे मागितले, तर खोट्या केसमध्ये अडकवेन, अशी धमकीही तिने दिली होती. माझ्या वडिलांनी या महिलेच्या त्रासाला जाचाला कंटाळून गळफास घेतला. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांनी कविता बाळासाहेब गिते या महिलेला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक पडवळ करत आहेत.

Trending