आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Are Learning The Mantra Of Eliminating All Kinds Of Larvae Learning From Farming School

शेतीशाळांतून शेतकरी शिकताहेत सर्व प्रकारच्या अळ्यांचा नाश करण्याचा मंत्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - मराठवाड्यात २०१२ पासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. आता मावा, फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे, पतंगवर्गीय किडी अंडी, अमेरिकन लष्करी अळ्यांसारखे विविध रोग पिकांवर पडू लागल्याने शेतकरी हतबल आहेत. या अळ्यांचा कसा नायनाट करावा, याबाबत शेतकरी प्रशिक्षित होण्यासाठी कृषी विभागाच्या आत्माकडून ‘शेतीशाळा’ घेतल्या जात आहेत. यात मराठवाड्यातील ७६ तालुकानिहाय प्रत्येकी १० अशा ७६० शेतीशाळा घेणे सुरू आहे. या शाळांत जून महिन्यातील पिकांच्या लागवडीपासून ते नोव्हेंबरपर्यंतच्या पीक काढणीपर्यंतच्या सहा वर्गांतून हजारो शेतकऱ्यांना अंडी कशी तयार होते, त्यांचे प्रजनन कसे रोखावे, याबाबत ‘धडे’ मिळत आहेत. 

आत्मा विभागांतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी गट, कंपन्या, शेतकरी मित्र तयार झाल्या आहेत. या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे लाखोंच्या संख्येने शेतकरी एकत्रित येऊन शेती करू लागले आहेत. दरम्यान, चालू वर्षात अमेरिकन लष्करी, ठिपक्यांचे बोंड, तंबाखूवरील पाने खाणारी, उंट, पाने गुंडाळणारी अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांची वाढ खुंंटते. तसेच पाने, देठे कुरतडून पिकांचे नुकसान होऊन पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी शेतकरी सक्षम व्हावे, विविध रोग, अळ्यांचे परिणाम रोखण्यासाठी शेतकरीही अभ्यासू व्हावेत, यादृष्टीने कृषी विभागाने मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यात दहा कार्यशाळा घेतल्या जात आहेत. या कार्यशाळांमध्ये परिसरातील विविध गावांतील शेतकऱ्यांना बोलावून याबाबत मार्गदर्शन केल्या जात आहे. 

या शेतीशाळांमुळे शेतकऱ्यांना विविध रोगांची ओळख होऊन पुढील दुष्परिणाम रोखण्यासाठी या शेतीशाळांतील ‘धडे’ शेेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. जालना जिल्ह्यातील या शेतीशाळांसाठी जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्माचे दत्तात्रय सूर्यवंशी, अर्जुन मद्दलवर, कृषी अधिकारी नंदकिशोर पुंड यांच्यासह ज्या-त्या गावातील कृषी सहायक परिश्रम घेत आहेत. सदरील शेतीशाळांमध्ये शेतकऱ्यांना माहिती पुस्तकांचेही वाटप करण्यात येते.फवारणी करत असताना कीटकनाशकांचा सुरक्षित हाताळणी या विषयावर व्याख्यान देऊन हातमोजे, गॉगल, बूट, टोपी सुरक्षित किटचा शेतकऱ्यांनी कस वापर करावा, याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. 
 
या अळ्यांचा रोखताहेत प्रजननासह प्रादुर्भाव 
अमेरिकन लष्करी अळी, ठिपक्यांची बोंड आळी, तंबाखूवरील पाने खाणारी आळी, उंट अळी, पाने गुंडाळणारी या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी कोणते भुंगे शेतात वाढीसाठी प्रयत्न करावेत, हे भुंगे कशा प्रकारे किडींचा नायनाट करतात, तसेच कोणते कीटक नाशकाच्या फवारण्या केल्यावर किडींची संख्या कमी होते यावर मार्गदर्शन करण्यासह माहितीपुस्तिकांचे वाटप केले जात आहे. 
 
जून ते नोव्हेंबरपर्यंत यावर पीकनिहाय  होताहेत शेतीशाळा 
जून : पिकांची लागवड 
जुलै : कीड व रोग नियंत्रण 
ऑगस्ट : आंतर मशागत 
सप्टेंबर :  काढणीपश्चात तंत्रज्ञान 
 
शेतीशाळांना प्रतिसाद 
शेतीशाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पिकांसह किडीविषयी शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध धडे घेतल्या जात आहे. यातून पुढील वर्षी लागवड करताना शेतकऱ्यांना या वर्षीच्या अभ्यासाची चांगली मदत होणार आहे. 
बाळासाहेब शिंदे, प्रकल्प संचालक, आत्मा जालना. 
 

बातम्या आणखी आहेत...