आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा ३०१ शेतमजुरांना विषबाधा; कारवाई इशाऱ्याने संबधित शेतमालकही धास्तावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - कीटकनाशक फवारणीतून यंदा अातापर्यंत ३०१ जणांना विषबाधा झाली असून, दाेघांचा मृत्यू झाला अाहे. िवषबाधेमुळे शेतमजूर मृत्युमुखी पडल्यानंतर अाता याप्रकरणी संबंधित शेतमालकावरच कारवाईची टांगती तलवार असून, विषबाधेचा अाकडा वाढतच असल्याचे नाेटीस मिळण्याच्या शक्यतेने शेतमालक धास्तावले अाहेत. 

 

गत वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील किटकशकांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर हेच लाेण अकाेला जिल्ह्यातही पसरले हाेते. त्यानंतर अकाेला जिल्ह्यातही गतवर्षी कीटकनाशक फवारणीतून विषबाधेमुळे १२ शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाल्याचे उजेडात अाले हाेते. या मृत्युप्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय अायुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात अाले हाेते. यंदा कृषी विभागाने घातक असलेल्या किटकनाशांवर काही कालावधीसाठी बंदीचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतला हाेता. 

११ शेतकरी-शेतमजुरांचा झाला हाेता मृत्यू : अकाेला जिल्ह्यातही कीटकनाशक फवारणीतून विषबाधेमुळे सात शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला हाेता. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये नितीन श्रीकृष्णा खंडारे, फराेज खान साहेब खान ,रामेश्वर श्रीराम वाघ, प्रवीण अजाबराव रायबाेले , संदीप जगदेव सरसाट ,शेख इम्रान शेख लाल ,राजेश मनाेहर फुकट अादींचा यांचा समाेवश हाेता. यापैकी ९ जणांना प्रत्येकी ४ लाखाची मदतही मिळाली. 

 

असा ताे निर्णय : फवारणीतून विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याप्रकरणी कार्यवाहीसाठी १२ अाॅक्टाेबर २०१७ राेजी शासनाने परिपत्रक जारी केले हाेते. किटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी, शेतमजूर यांनी प्रतिबंधात्मक किटचा म्हणजेच हातमोजे, चष्मा, मास्क, टाेपी, अॅप्रन, बुट इत्यादीचा वापर कटाक्षाने करावा, शेतमालकाने किटकनाशकांची फवारणी करताना स्वत:ला, घरातील कुटुंबीयांना अथवा शेतमजुरांना विषबाधा झाल्यास प्रथमाेपचार करण्याच्या दृष्टीकाेनातून प्रथमाेपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध ठेवावे अादीसह अनेक मुद्द्यांचा उहापाेह करण्यात अाला हाेता. दरम्यान विषबाधा झाल्यास त्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी संबंधित शेतमालकाची राहील, असेही त्यात नमूद करण्यात हाेते. 

 

विषबाधाप्रकरणीही नाेटीस बजावण्याची शक्यता? 
फवारणीतून विषबाधा झाल्याप्रकरणीही शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून नाेटीस बजावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत अाहे. याबाबत कृषी विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात कृषी अधिकाऱ्यांवरही कार्यवाहीची जबाबदारी साेपवली हाेती. अाता विषबाधेच्या प्रत्येक प्रकरणांचा स्वतंत्र अभ्यास करुन काेणावर काेणती जबाबदारी निश्चित करण्यात येईल, हे पाहणे अाैत्सुक्याचे राहणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...