आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्काचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्याचे मंदिरात उपोषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव- तालुक्यातील शहर टाकळी येथील ऊस उत्पादक शेतकरी सीताराम किसान पुंडकर यांनी स्वतःच्या व शेतकऱ्यांच्या ऊस पिकाच्या फरकाच्या पेमेंटसाठी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेल्या फसवणुकीविरोधात हनुमान मारुती मंदिरात उपोषण सुरू केले.


पुंडकर हे ज्ञानेश्वर कारखाना भेंडा कारखान्याचे सभासद असूनही त्यांना देऊ केलेले पेमेंट २१०० व त्यावरील फरकाची रक्कम ४०० असे एकूण २५०० नुसार ठरल्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम देण्याची कबुली ज्ञानेश्वर कारखाना भेंडा यांनी प्रसिद्ध पत्रकात केली होती. मात्र, या बाबत शेतकऱ्यांच्या आर्थिकतेचा कोणत्याही विचार न करता गळीत हंगामाच्या सुरुवातीला काही शेतकऱ्यांना २५०० प्रती टन भाव देऊ केले व त्यानंतर २१०० प्रती टन प्रमाणे पेमेंट देऊन दुजाभाव केला. त्यावरील फरकाचे ४०० रुपये देण्यास टाळले. शेतकऱ्यांना आपल्या घरातील सोने-नाणे विकून पीक उत्पादन करावे लागते. त्यातही वीज खंडित होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची कळ सोसावी लागत आहे. या वेळी भाजप बूथ प्रमुख दहीगावने मोहन खंडागळे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ माळवदे, राष्ट्रीय समाज पक्ष शेवगाव तालुका आत्माराम किसान कुंडकर, लिंगायत समाज संघटना सदस्य कैलास लद्दे आदींनी व शहर टाकळी परिसरातील शेतकऱ्यांनी उपोषणास पाठिंबा दिला. १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर कारखानदारांनी फरकाची रक्कम जमा न केल्यास उपोषण तीव्र करू, असे कुंडकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...