आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्यांच्या भीतीमुळे पिंजऱ्यात कोंडून घेऊन शेतातील पिकाचे रक्षण करताहेत शेतकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुनागड, अमरेलीत बिबट्यांची दहशत

जुनागड/अमरेली- गुजरात राज्यातील सौराष्ट्रमधील अमेरली आणि जुनागड जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे. बिबट्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी शेतकरी स्वत:ला पिंजऱ्यात कैद करून शेताचे रक्षण करत आहेत. अमरेलीत मागील तीन दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. नरभक्षक  बिबट्याला गोळी मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर, वन विभागाने बिबट्याला तत्काळ जेरबंद करावे अन्यथा आम्ही त्याला ठार करू, असा इशारा आमदार हर्षद रिबडिया यांनी दिला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ८ महिन्यांमध्ये  १७ लोकांचा मृत्यू तर ५० जण जखमी झाले आहेत.  शार्पशूटरची ८ पथके, १५० वनकर्मचारी रवाना

अमरेलीमध्ये दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी जिल्हाधिकारी आयुष ओक यांच्याकडून घटनेचा आढावा घेतला. १५० पेक्षा जास्त वनविभागाचे कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बगसरा तालुक्यात रवाना झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी ३० पिंजरे लावण्यात आले आहे. याशिवाय शार्पशूटरचे ८ पथक रवाना झाले आहे. ६१ बिबट्यांवर दर महिन्याला १२.८१ लाख रुपये खर्च
 
जुनागडमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयात नरभक्षक बिबट्यांसाठी विशेष क्षेत्र बनवण्यात आले आहे. यामध्ये सध्या ४५ नरभक्षक बिबटे आहेत. प्राणीसंग्रहालय प्रशासन बिबट्यांच्या पालनपोषणावर दर महिन्याला १२.८१ लाख रुपये खर्च करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...