आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक शेतकऱ्याने स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता, सलमान खानमुळे त्याला इतके पैसे मिळतील की फेडता येतील सगळे कर्ज; मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नदेखिल मिटेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना- एका शेतकऱ्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. त्याची जमिन एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी भाड्याने दिल्यानंतर इतके पैसे मिळतात की घराची परिस्थीतीच बदलून जाईल. शेतकऱ्याचे नाव सुरींदर सिंग असून तो बल्लोवाल या गावात त्याची शेती आहे. 10 दिवसांआधी सुरींदरसोबत याविषयी चर्चा झाली होती. त्यानंतर त्या सुरींदरची जमीन तीन आठवड्यांकरीता भाड्याने घेऊन एका एकर जमिनीसाठी 85 हजार रुपये देण्यात येतील. त्यानंतर 25 नोव्हेंबरपर्यंत साडेचार एकर जमिनीसाठी सुरिंदरला 3 लाख 65 हजार रूपये भाडे देण्याचा करार झाला.

 

शेतकऱ्याच्या शेतीत सुरू आहे सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाची शूटिंग

> सुरींदरला सगळी रक्कम मिळताच त्याने 1 लाख रुपये कर्ज भरण्यासाठी बाजुला काढून ठेवले. उरलेली रक्कम घराच्या कामकाजासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याचे त्याने सांगितले. या शेतकऱ्याच्या जमिनीवर सध्या बॉलीवुड स्टार सलमान खानचा चित्रपट 'भारत'ची शूटिंग सुरू आहे.

 

शेती नापिक असल्यामुळे चिंतित असलेल्या शेतकऱ्याचे आले चांगले दिवस

>  या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत कतरीना कॅफसोबत बॉलीवुडचे अनेक स्टार भुमिका करणार आहे. या चित्रपटासाठी शेती भाड्याने देणारे सुरींदर सिंग हे खुपच खुश आहे. ते सांगतात की, आमच्या संपूर्ण कुटूंबाला स्पेशल पास मिळाले आहे. परंतू आम्हाला अजुनपर्यंत शूटिंग पाहण्यासाठी परवानगी नाही देण्यात आली. शूटिंग पाहण्यासाठी मुले खुपच उत्साहात आहे. टिव्हीवर दिसणारे फिल्मी स्टार यांना जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. या सुवर्ण संधीनंतर सुरींदर सांगतात की, भविष्यात पुन्हा अशी जमिन भाड्याने देण्याचा प्रस्ताव आला तर मी लगेच तो स्विकारून करार करून घेईल.

बातम्या आणखी आहेत...