आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात, आंदोलकांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी गाडी अडवल्याने कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज

मुंबई- प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला. पण, पोलिसांकडून त्यांचा हा मोर्चा अडवण्यात आला आणि बच्चू कडूंना ताब्यात घेण्यात आले. "राजभवन घेराव आंदोलन, मुंबईत होणार आहे. यासाठी सर्व प्रहार कार्यकर्त्यांनी व शेतकरी बांधवांनी होणाऱ्या आंदोलनास मोठया संख्येने मुंबई मध्ये उपस्थित राहावे," असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून बच्चू कडूंनी केले होते. मात्र बच्चू कडू यांना पोलिसांनी नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे, कलम 149 नुसारही नोटीस बजावली आहे, आंदोलन न करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. 

बच्चू कडू यांना राजभवनावर मोर्चा घेऊन जाणार होते, पण पोलिसांनी त्या आधीच बच्चू कडू यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. कार्यकर्त्यांची संख्या एवढी होती की, पोलिसांची एक पिंजरा गा़डी देखील कमी पडली. दरम्यान, पुनर्वसन सचिवांची भेट घेऊन आंदोलन स्थगित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बच्चू कडूंना घेऊन जाणारी पोलीस व्हॅन आंदोलकांनी अडवली. यावेळी सौम्य लाठीचार्जही करण्यात आला.  

बातम्या आणखी आहेत...