आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्जत - मुलींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही, असा कायदा आम्ही आणत आहोत. पोलिसांच्या कारवाईत कोणी हस्तक्षेप करणार नाही. जे खराब काम करतील, त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल, असे सांगत विधानसभा आणि लोकसभेतही महिलांना आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगितले. महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानांतर्गत लाभ वितरणाचा कार्यक्रम माहिजळगाव येथे झाला. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते.
अजित पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तथापि, याबाबत जादूची कांडी फिरवल्यासारखी लगेच कामे होणार नाहीत. जरा सबुरीने घ्या. शेतकऱ्यांनो, वीज बिल भरायला शिका. महावितरणवर ४५ हजार कोटींचे कर्ज आहे. राज्यातील वीज पंप लवकरच सौरऊर्जेवर आणणार आहोत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ अाणि मेडिकल काॅलेज करू : अजित पवार यांची पुण्यात ग्वाही
पुणे - राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान छाेटे विमानतळ असावे, कारण मागील काळात दाेन ते तीन माेठ्या दुर्घटना घडल्या. सांगली जिल्हा १५ दिवस पाण्याखाली राहिला, परंतु विमानतळ नसल्याने अावश्यक मदत लष्कराला पाेहोचवता आली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाेन वेळा हेलिकाॅप्टर अपघातातून बचावले. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक विमानतळ आणि तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड असावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साेमवारी एका कार्यक्रमादरम्यान केली. या वेळी उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विमानतळ तसेच मेडिकल काॅलेज पुढील काळात उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने पाच काेटी रुपये खर्चून उभारण्यात अालेल्या माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.