आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडले; विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- फळ पीक विम्याच्या दाव्याची रक्कम न मिळाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडून घेतल्याचा प्रकार आज(शुक्रवार) गौरक्षण रोडवरील न्यू इंडिया इन्शुरन्स कार्यालयात घडला. अकोट तालुक्यातील पणज, रुईखेड आणि बोचरा परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. 

जवळपास साडे सहा तास चाललेल्या आंदाेलनात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना अद्दल घडली. अखेर  कंपनीकडून एका आवड्यात दावे अदा करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांनी रात्री  8 वाजता आंदोलन मागे घेतले. त्यानंतर अधिकारी-कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर पडले. 


अकाेट तालुक्यातील पणज मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी 2018-19 मध्ये फळ पीक विमा काढला. मात्र केळीची पाने सुकली आणि वाढीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. परिणामी  केळी पीकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे दाव्याची रक्कम देण्याची मागणी केली. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. पूर्ण विम्याची 1 लााख 76 हजार रुपये मंजूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. काहींना दाव्यापाेटी पहिला हप्ता मिळाला. मात्र नंतर उर्वरित रक्कमच मिळाली नाही. अखेर जवळपास 35  शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी आज अकाेला येथील गौरक्षण रोडवरील न्यू इंडिया इन्शुरन्स कार्यालयात धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

बातम्या आणखी आहेत...