आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Son Sovon Acharya Research On Blood Cancer, He Completed Degree From IIT And AIIMS

गरीब शेतकऱ्याच्या टेली ऑपरेटर मुलाने IIT आणि AIIMS मधून घेतली डिग्री, जापानमध्ये जाऊन कँसरवर केला रिसर्च...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर- ही गोष्ट पश्‍चिम बंगालच्या बुधुपूराशी संबंधीत 26 वर्षांच्या शोवेन आचार्यची आहे. त्याचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. तो लहान असताना कँसरमुळे त्याच्या आईचा मृत्यु झाला त्यामुळे तो खुप दुखी झाला होता. पण नंतर त्याने कँसरसारख्या आजारांचा सामना करायचे ठरवले. यासाठी त्याने आयआयटी कानपूर आणि आता जापानमधून रिसर्च करून वापस आला आहे. शोवेन सध्या सीनियर रिसर्च फेलो म्हणून कँसर सारख्या आजारांशी सामना करत आहे.


काही क्षणात बदलले आयुष्य

- शोवेनने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, जेव्हा तो सातवीत होता, तेव्हा शिक्षणात त्याचे मन रमत नव्हते. तेव्हा अचानक आईची तब्येत खराब झाली आणि त्यांना कँसर असल्याचे डिटेक्ट झाले. 
- काही दिवसांतच त्यांचा मृत्यु झाला आणि ही गोष्ट त्याच्या मनात घर करून गेली. त्याने विचार केला की, क्षणार्धात आयुष्य घेणाऱ्या या आजारावर कशी मात करावी आणि तेव्हाच त्याने या आजाराशी लढण्याचे ठरवले.


शिक्षणासाठी नव्हते पैसे

- शोवेनने सांगितले- त्या घटनेनंतर मी चांगला अभ्यास करू लागलो, 10 वी आणी 12 वीत चांगले मार्क्स मिळवले पण त्यानंतरच्या शिक्षणासाठी माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते.
- त्यानंतर मी कोलकत्ताला येऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
- कोलकत्ताच्या एका रूग्णालयात रिसेपशनिस्‍टची नोकरी सुरू केली. नोकरी करताना थोडे मेडीकल फिल्डची माहितीदेखील घेतली.


इंटरनेटवरून शिकलो
- त्याने सांगितले, जेव्हा डॉक्टर कोणावर उपचार करायचे किंवा कीहा लिहायचे आणि रूग्णांशी बोलायचे तेव्ही मी त्यांना ऐकायचो आणि डायरीमध्ये नोट करून घ्यायचो.
- घरी कोणत्याही माहितीसाठी इंटरनेटवर सर्च करायचो आणि व्हिडिओ पाहून शिकायचो.

नॉलेजपाहून चकीत झाले डॉक्टर 
- एक वेळ अशी आली की, माझे नॉलेज पाहून डॉक्टरदेखील चकीत झाले. त्यांनी विचार केला की, एका रिसेप्शनीस्टकडे इतके नॉलेज कसे आले त्यानंतर त्यांनी मदत करायला सुरू केले.
- त्यानंतर ही नोकरी सोडून टाटा कँसर हॉस्‍पटिलमध्ये टेलीफोन ऑपरेटर बनलो. येथेही तेच करत होतो, डॉक्टरांना खुप काही विचारायचो आणि तेही मला माझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे द्यायचे.


शिक्षणात झाला होता 2 वर्षांचा गॅप
- हॉस्पिटलमध्ये काम करत असाताना नॉलेज तर मिळाले पण शिक्षणात 2 वर्षांचा गॅप पडला. त्यामुळे कोलकत्ता यूनिव्हर्सीटीच्या नियमांमुळे मला अॅडमिशन नाही मिळाले.
- त्यानंतर नोकरी सोडून बीएससीमध्ये अॅडमिशनसाठी कानपूरला गेलो. तेथील 65 हजारांची फीस भरण्यासाठी वडिलांनी काही शेती विकली आणि माझी फीस भरली.


असा सुरू झाला कँसरवर रिसर्च
- कानपूर यूनिव्हर्सिटीमधून पॅरामेडिकल सायंसमध्ये अॅडमिशन घेतले. शिक्षणादरम्यान क्लासेसमध्ये शिकवू लागलो. 
- त्यानंतर आयआयटीचे बॉयोटेक्‍नोलॉजीचे प्रोफेसर डॉ. प्रदीप सिन्हा यांना अप्रोच केले आणि त्यांनी मला रिसर्समध्ये मदत करण्यास तयार झाले. 
- त्यांच्यासोबत कँसरच्या सब्जेक्टवर काम करू लागलो. प्रोफोसर सिन्हा त्या सेल्सवर काम करू लागले ज्याने ओळखले जाते की, एकदा कँसर बरा झाल्यावरही तो परत कसा येतो.


AIIMS मधून पूर्ण केली मास्टर्सची डिग्री
- शोवेनने सांगितले की, त्यानंतर त्यानी दिल्‍लीच्या ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसमधून मास्‍टरच्या डिग्रीसाठी अप्लाय केले. त्यात त्याचे सलेक्शन झाले आणि तिथे त्याने फेलोशीपसाठी फॉर्म भरला.
- अप्लाय केल्यानंतर माझे सलेक्शन झाले आणि मला जापानला पाठवले. परत आल्यानंतर पश्‍चिम बंगालच्या कल्‍याणी शहरात नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ बायोमेडिकल जेनोमिकमध्ये सीनियर रिसर्च फेलो म्हणून काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...