आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले लावारिस; भाजप प्रवक्ते वाघांच्या टि्वटने वाद
मुंबई- भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे राजकारण तापले आहे. एका ट्विटला रिप्लाय देताना वाघ यांनी ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात
बाबा... असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून वाघ यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली आहे.
मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरून ‘शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या पत्रकारांना ट्रोल करू नका’ असे ट्विट करण्यात आले होते. त्याला रिप्लाय करताना वाघ यांनी वादग्रस्त टि्वट केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावारिस म्हणणे हा शेतकऱ्यांचा मोठा अपमान असल्याची टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. येत्या काही दिवसांत हा वाद आणखी पेटण्याची शक्यता अधिक आहे.