आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार सुजय विखेंच्या 'त्या' वक्तव्याचा शेतकरी पुत्रांकडून निषेध, विखेंना पाठवला 2 हजारांचा चेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर - पंतप्रधान मोदींनी दिलेले २ हजार रुपये शेतकऱ्यांना चालतात, मग भाजपचे कमळ का नको, असे वक्तव्य करणारे खासदार सुजय विखे यांच्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. नगरमधील शेतकऱ्यांच्या संतप्त मुलांनी विखे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी सुजय विखे यांना एका निवेदनासह 2 हजार रुपयांचा चेक पाठवला आहे. 
 

शेतकरी पुत्रांनी निवेदनासह दोन हजारांचा चेक पाठवला 
सुजय विखेंनी केलेल्या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी काही तरुणांनी त्यांना 2 हजार रुपयांचा चेक पाठवला आहे. आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये पाठवत आहोत. सुजय विखेंनी लोणीमध्ये कमळाला सोडून कोणालाही मत द्यावे असे आवाहन या तरुणांकडून करण्यात आले आहे. 
'दोन हजारांत आपली किंमत करू पाहणारे सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील, ज्यांच्यासाठी सुजय नैतिकता बाजूला ठेवून मतांचा जोगवा मागत आहेत त्या राम शिंदे व त्यांच्या पक्षाला अजिबात मतदान करू नका, असे आवाहन या तरुणांनी शेतकऱ्यांना केले आहे.
 

राम शिंदे यांच्या प्रचारसभेत सुजय विखे यांनी शेतकऱ्यांचा अपमान करणारे वक्तव्य केले होते
शक्रवारी कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आले होते. यावेळी प्रचारसभेत सुजय विखे यांनी शेतकऱ्यांचा अपमान करणारे वक्तव्य केले होते. 'शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींचे दोन हजार रुपये चालतात. मग त्यांचे कमळ का नको? तुम्हाला कमळ चालत नसेल तर पैसे परत करा. आम्हाला ते पैसे गरीबांसाठी तरी वापरता येतील.' असे सुजय म्हणाले होते.