Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Farmers wife appeal to PM Modi to do something of crop value

मोदीजी, काहीतरी करा, आता तरी मालाला भाव द्या - आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीचे आर्जव

प्रफुल्ल कुंवर | Update - Apr 22, 2019, 09:03 AM IST

कांदा चाळीत जीव संपवणारे शेतकरी अहिरराव यांच्या पत्नीचे आर्जव

  • Farmers wife appeal to PM Modi to do something of crop value

    नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साेमवारी नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात प्रचारसभा हाेत अाहे. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये ते मतदारांना संबोधित करीत असतील तेव्हा येथून जवळच असलेल्या तहाराबादच्या बाळू अहिररावांच्या घरी त्यांचं तेरावं सुरू असेल. कांद्याला शंभर रुपयेही भाव न मिळाल्याने कर्जफेडीची आशा संपलेल्या अहिररावांनी ११ एप्रिल राेजी कांदा चाळीतच गळफास घेतला होता. त्यांच्या पश्चात ३६ वर्षांच्या पत्नीच्या पुढे मजुरीवर दिवस काढण्याशिवाय पर्याय नाही. अाता शेतीचं १५ लाखांचं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत त्या अाहेत. रडवेल्या शब्दात त्या परत परत एकच वाक्य म्हणत राहतात... ‘मोदीजी, काहीतरी करा.. आमच्या मालाला भाव द्या..!’

    बाळू अहिररावांच्या चाळीत ३०० क्विंटल कांदा पडून आहे. त्यांनी मार्केटमध्ये जो कांदा नेला त्याला फक्त शंभर रुपये भाव आला. त्यानंतर दुसरा कांदा मार्केटमध्ये नेण्यासाठी पैसेही उरले नाहीत तेव्हा त्यांनी दीडशे क्विंटल कांदा उकिरड्यावर फेकून दिला. चार वर्षांपूर्वी घेतलेल्या ८ लाख कर्जाचा डोंगर १५ लाखांवर गेला. कांद्यातून पैसे मिळण्याची आशाही संपली तेव्हा मित्रांना फोन करून त्यांनी कांदा चाळीतच गळफास घेतला. ‘त्या दिवशी मी मजुरीला गेले होते दुसऱ्याच्या शेतात... ‘ बाळू यांच्या पत्नी वैशालीताई रडून रडून काेरड्या झालेल्या नजरेने सांगत हाेत्या. ‘बँकेचे सारखे फोन येत होते. ५ रुपये शेकड्यानं ५ लाख बाहेरचं कर्ज घेतलं होतं. त्यांच्या धमक्या येत होत्या..’ घरातल्या एकुलत्या एका खुर्चीवर एक शाल पांघरून अहिररावांचा फोटो ठेवला होता. पत्र्याच्या लहानशा घरात त्या मुलासोबत राहतात.

Trending