आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूरजवळील मिहान परिसरात वाघाच्या धास्तीने मुखवटे लावून काम

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपूरपासून जवळच असलेल्या मिहान आैद्याेगिक वसाहतीत वाघाचा मुक्काम असल्याचे समजल्यापासून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. खासगी कंपन्यांत काम करणारे कर्मचारी जीव मुठीत धरून कामावर जात असल्याचे दिसते. 

आता या भागातून काढता पाय घेऊन वाघ सुकळी, खडका या शिवारातून पुढे त्याच्या मूळ अधिवासात परत जाताना दिसतो आहे. त्याच्या पाऊलखुणाही आढळल्या आहेत. दरम्यान, या भागातील ग्रामस्थ जीव वाचवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या करत आहेत. 

शेतात काम करणारे गावकरी पाठीमागून वाघ हल्ला करू नये म्हणून डाेक्याच्या मागील बाजूस मुखवटा घालून काम करत आहेत. या भागात वन विभागाने कॅमेरा ट्रॅप लावले असून काही ठिकाणी वन कर्मचाऱ्यांची पथकेही तैनात केली आहेत.

बातम्या आणखी आहेत...