आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला पितृशोक, शबाना आझमी, उर्मिला मातोंडकरसह यांनी घेतले अंत्यदर्शन 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या वडिलांचे आज निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  दीर्घकाळापासून ते आजारी होते. निधनाचे वृत्त कळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकार मनीष मल्होत्राच्या निवासस्थानी पोहोचले होते. या कठीण समयी मनीषचे फिल्म इंडस्ट्रीतील मित्र त्याच्यासोबत आहेत. करण जोहर, शबाना आझमी, सौफी चौधरी, बोनी कपूर, उर्मिला मातोंडकरसह अनेक कलाकारांनी मनीष मल्होत्राच्या वडिलांचे अंत्यदर्शन घेतले. मनीषचा भाचा पुनीत मल्होत्राने त्यांना खांदा दिला होता.